
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा वरली मटका जुगारावर छापा….
पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने रहाटगाव येथे वरली मटका अड्ड्यावर छापा टाकुन जुगाराचे साहीत्यासह ६ आरोपींना घेतले ताब्यात…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी, यांचे आदेशाने त्यांचे विशेष सि.आय.यु. पथक हे दि 28/09/2024 रोजी दुपारी २.५०।वा चे सुमारास पोलिस स्टेशन नांदगाव पेठ हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना सि.आय.यु. पथकातील सपोनि महेन्द्र ईंगळे यांना गोपनीय माहीती मिळाली की नांदगाव पेठ हद्दीत राहाटगाव, येथे सुमित मोहोड हा वरली मटक्याच्या आकड्यावर लोकांकडुन पैसे घेवुन जुगाराचा हारजीतचा खेळ खेळवित आहे.


अशा खात्री लायक माहीती प्राप्त झाल्याने नमुद ठिकाणी जावुन रेड केला असता आरोपी क्र. 1) राहुल दिलीपराव मोहोड वय 36 वर्ष रा. राहाटगाव अम 2) निकेश जनार्दन तायडे वय 36 वर्ष रा. राहाटगाव अम. 3) अशोक वाघजी वानखडे वय 62 वर्ष रा. राहाटगाव अम. 4) सुनिल लालसिंग कोल्हे वय 32 वर्ष रा. डोमा, चिखलदरा अम. 5) योगेश बबनजी राऊत वय 28 वर्ष रा. करजगाव अम. 6) पंकज चक्रधर भालेराव वय 33 वर्ष रा. राहाटगाव अम. यांना ताब्यात घेवुन, ताब्यातील इसमांकडुन जुगाराचे साहीत्य 1) नगदी 11,900/- रु., 2) दोन अँन्ड्रॉईड मोबाईल कि.अ. 15,000/- रु. 3) वरली मटक्याच्या चिठ्या (बुक) असा एकुन 26,900/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन नमुद इसमांविरुद्ध पोलिस स्टेशन नांदगाव पेठ अमरावती येथे कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनीयम अन्वये गुन्हा नोंद कर ग्यात आला आहे.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आदेशाने सिआययु पथकातील स.पो.नि. महेन्द्र इंगळे, स.फौ. विनय मोहोड, पोहवा सुनिल लासुरकर, जहीर शेख, ना.पो.शि. अतुल संभे, पो.शि. राहुल देंगेकर, विनोद काटकर यांनी केली



