अमरावती शहर गुन्हे शाखा युनीट २ ने संशयीत ईसमास ताब्यात घेऊन उघड केला मोटारसायकल चोरीचा गुन्हा…
रेकॅार्डवरील गुन्हेगारास ताब्यात घेऊन गुन्हे शाखा युनीट १ ने उघड केला मोटर सायकल चोरीचा गुन्हा,आरोपीच्या ताब्यातून गुन्हयातील मोटर सायकलसह एकूण ३,३०,०००/- रू चा मुददेमाल केला जप्त….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि.(२४) मे रोजी यातील फिर्यादी धिरज लुल्ला रा. रामपुरी कॅम्प यांनी पो.स्टे. गाडगेनगर येथे तक्रार दिली की,दि.(२२) मे रोजी त्यांनी त्यांची बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल क्र. एमएच २७ बी आर त्यांचे घरासमोर उभी ठेवली होती दुपारी १२.०० दुकानावर जाण्यास घराचे बाहेर आले तर ठेवलेल्या ठिकाणी फिर्यादी यांना त्यांची गाडी दिसून आली नाही. फिर्यादी यांनी घराशेजारी असलेले सिसिटीव्ही कॅमेरा चेक केला असता एक अनोळखी पुरुष व्यक्ती तोंडाला दुपटटा लावून त्यांची गाडी लोटत चोरून नेतांना दिसला.
कोणीतरी अज्ञात अनोळखी व्यक्तीने त्यांची बजाज पल्सर गाडी चोरून नेली यावरून पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अप.क्र ४८९ / २०२४ कलम ३७९ भादवि चा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस आयुक्त, नविनचंद्र रेडडी यांनी आदेशीत केल्यावरून गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांच्या नेतृत्वात सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना दि.०१/०६/ २०२४ रोजी गुप्त बातमीदाराकडून माहिती प्राप्त झाली की सदरचा गुन्हा हा रेकॅार्डवरील गुन्हेगार आतिफ खान इनायत खान वय २७ वर्ष रा. सुफियान नगर नं. २, इंडीयन गॅस एजन्सी च्या बाजुला, अमरावती याने केला आहे.
सदर माहीतीच्या आधारे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने
सुफियान नगर नं. २ येथे सापळा रचुन सदर आरोपी यास मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. त्याची कसोशीने चौकशी करून त्याला
विश्वासात घेवून गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केले. त्याचे ताब्यातून गुन्हयात चोरी
गेलेली बजाज पल्सर मोटर सायकल व गुन्हा करते वेळी वापरलेला ॲटो असा एकूण ३,३०,००० /- रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर,सहाय्यक पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे, सफौ राजेंद्र काळे, पोहवा जावेद अहमद, गजानन ढेवले,दिपक सुंदरकर,नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, चंद्रशेखर रामटेके, पोशि चेतन कराडे, योगेश पवार,निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले पोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.