नामांकित कंपनीची नकली दारु बनविणाऱ्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या नकली अवैध देशी दारूच्या कारखान्यावर गुन्हे शाखेचा छापा… 





अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. (08) जुलै 2024 रोजी रात्री 9.00 वा चे सुमारास गुन्हे शाखा युनीट १ चे पथक शहरात पेट्रोलींग करीत असताना पथकास गोपनीय माहीती मिळाली की अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी असलेल्या फॅक्टरीमध्ये काही इसम आपल्या आर्थीक फायद्याकरीता अवैधरीत्या बनावटी देशी दारूची निर्मीती करीत आहे



अशी मिळालेली बातमी  लागलीच वरिष्ठांना  देवून सदर पथकांने  मिळालेल्या माहीतीप्रमाणे अमरावती एमआयडीसी परिसरातील प्लॉट नं. ई 26 या ठिकाणी जाउन फॅक्टरीमध्ये छापा कार्यवाही केली असता सदर ठिकाणी 1) हर्षवर्धन रमेश सपकाळ वय 42 वर्ष रा. मोतीनगर बगीच्याजवळ, अमरावती 2) सागर सुरेश तिवारी वय 43 वर्ष लॉर्डस हॉटेलच्या मागे, गणपती नगर, अमरावती 3) योगेश विकास प्रधान वय 24 वर्ष काम मजुरी रा. गल्ली नं. 9. किरण नगर, अमरावती हे तीन इसम आपल्या आर्थीक फायद्याकरीता सदर ठिकाणी  देशी दारू बॉबी संत्रा आणि देशी दारू टैंगो पंच कंपनीच्या देशी दारूच्या नकली मालाची निर्मीती करताना मिळुन आले



सदर ठिकाणी आरोपींनी अहमदनगर येथे असलेल्या बॉबी आणी संजीवणी देशी दारू संजिवणी डिस्टीलरी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना लिमीटेड ता. कोपरगाव जि अहमदनगर महाराष्ट्र येथे निर्मीत होत असलेल्या” देशी दारू बॉबी संत्रा ” आणि ” देशी दारू टैंगो पंच या मुळ कंपनीप्रमाणेच हुबेहुब देशी दारूचा नकली माल तयार करण्याकरीता आवश्यक असलेले अल्कोहोल, ऑरेंज फ्लेवर, आर ओ प्लांट, बॉटल फिलीग मशीन, कॅपींग मशीन,प्रिंटींग साहीत्य, बॉक्स, रिकाम्या बॉटल, स्टॅम्प, प्रींटेड सेलो टेप व इतर साहीत्याच्या माध्यमातुन नकली बनावटी संजीवणी देशी दारू या ब्रांडची निर्मीती करताना मिळून आले

आरोपी हे सदर निर्मीती केलेला नकली माल आपल्या इको स्पोर्ट कार क्र. एम एच 35 पी 5919 ने अमरावती जिल्हयातील अवैधरीत्या किरकोळ विक्रेत्यांना विकत होते. आरोपींकडुन 90 मिली नकली देशी दारूने भरलेल्या बॉटल असलेले 3400 बॉटल, 35 लीटर क्षमतेच्या फार्माग्रेड अल्कोहोलने भरलेल्या एकुण 21 कॅन, गोल्डन ऑरेंज फ्लेवरच्या 5 लीटर क्षमतेच्या 7 कॅन, निर्मीती करीता वापरलेल्या वेगवेगळ्या मशीनरी, प्रींटींग साहीत्य, आणि इको स्पोर्ट कार क्र. एमएच 35 पी 5919 असा एकुण 10,90,248/- रू चा माल जप्त करण्यात आला व आरोपीं विरुध्द पोलिस ठाणे राजापेठ येथे अप.क्र. 474/2024 कलम 123, 318 (4), 334, 336 (2), 340 (2) भा. न्याय संहिता सहकलम 65 (अ) (क)(ड) (ई),ख् 83. 90. 108, 86 महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला व तिन्ही आरोपी आणि जप्त
मुद्देमाल पुढील कार्यवाही करीता पोलिस स्टेशन राजापेठ यांचे स्वाधिन करण्यात आले आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,पोलीस उपायुक्त(मुख्यालय) कल्पना बारवकर,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे (परी २) सहा पोलिस उपायुक्त,राजापेठ विभाग दत्तात्रय भवर  यांचे मार्गदर्शनाखाली गोरखनाथ जाधव वरिष्ठ पोलिस निरीक्षक गुन्हे शाखा युनिट क्र. 1.स.पो.नि. मनिष वाकोडे, योगेश इंगळे, अनिकेत कासार पोउपनि प्रकाश झोपाटे, पो. हवा फिरोज खान, पो.शी. सुरज चव्हाण, अमोल मनोहर, निखील गेडाम, अनिकेत वानखडे, फोटोग्राफर श्री सुधीर गुडघे, चालक अलीमोद्दीन खातीम यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!