अमरावती शहरात विक्रीकरीता गांजाची वाहतुक करणारे गुन्हे शाखा युनीट २ चे ताब्यात…
अमरावती शहरात गांजा (अंमली पदार्थ) विक्री करीता आणणारे २ गुन्हेगारांना ताब्यात घेवून त्यांच्या ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ गांजा जप्त करण्यात आला…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेडडी यांनी अमरावती शहरा मध्ये अंमली पदार्थ विक्री करणा-या इसमांचा शोध घेवुन त्यांचेवर कठोर कारवाई करणे बाबतच्या सुचना गुन्हे शाखा तसेच सर्व प्रभारींना दिलेल्या होत्या त्यांनी आदेशीत केल्यावरून गु्न्हे शाखा युनीट २ पोलिस निरीक्षक राहुल आठवले यांच्या नेतृत्वात दि(२८) रोजी पोलिस आयुक्तालय हददीत गुन्हेगार चेकींग, अवैध्द धंदयावर रेड व अंमली पदार्थ वर रेड करण्याकरीता पेट्रोलींग करीत असतांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीलायक माहीती मिळाली की, दोन इसम रहाटगाव कडून अमरावती कडे येणा-या रोडने एका मोरपंखी रंगाच्या बॅग मध्ये गांजा (अंमली पदार्थ) घेवून येत आहे.
अशा मिळालेल्या माहीतीवरून सदर ची माहीती वरिष्ठांना देवून त्यांच्या आदेशाने अर्जून नगर चौक बस स्टॉप येथे सापळा रचुन छापा कार्यवाही केली असता दोन इसम १) जाकीर खान वल्द रहेमत खान वय ४० वर्ष रा. ताजनगर नं. २, छोटु पेंटरचे घराजवळ अमरावती २) छत्रपती कचरूजी बांबोर्डे वय ६० वर्ष रा. लुंबिनी नगर गजभिये किराणा दुकानाजवळ अमरावती यांना ताब्यात घेवून त्यांचे
ताब्यातून १५.४२५ कि. ग्रॅ, २ मोबाईल फोन, नगदी ८,०५०/- रू असा एकूण ३,२८,५५० रू चा मुददेमाल जप्त करून ताब्यात घेतला. सदर घटनेची फिर्याद पो.स्टे. गाडगेनगर येथे देवून अप. कं /२०२४ कलम २०,२२,२९, एन. डी. पी. एस. अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
अमरावती शहरातील तरूण पिढी व्यसनाधीन होत असल्याने त्या गोष्टींना आळा बसावा याकरीता गुन्हे शाखा युनिट क्र. २ तर्फे
गोपनिय यंत्रणा राबवून अंमली पदार्थ विक्री व वाहतूक करणारे आरोपी यांची माहीती काढून त्या माहीतीच्या आधारे आरोपी १ ) जाकीर खान वल्द रहमत खान वय ४० वर्ष रा. ताजनगर नं. २, छोटु पेंटरचे घराजवळ अमरावती २) छत्रपती कचरूजी बांबोर्डे वय ६० वर्ष रा. लुंबिनी नगर गजभिये किराणा दुकानाजवळ अमरावती यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले
सदरची कामगिरी .पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी साहेब,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त सागर पाटील, पोलिस उपायुक्त कल्पना बारवकर, सहाय्यक पोलिस आयुक्त प्रशांत राजे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, सपोनि सत्यवान भुयारकर, सपोनि योगेश इंगळे (एटीबी), पोउपनि संजय वानखडे, सफौ राजेंद्र काळे, पोहवा जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, सुधिर गुडधे, अजय मिश्रा, नापोशि संग्राम भोजने, मंगेश शिंदे, चंद्रशेखर रामटेके, पोशि चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, अनिकेत वानखडे (सायबर), पोहवा संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.