अवैधरित्या खंजर व चाकु बाळगणारे युनीट १ च्या ताब्यात…
गुन्हेशाखा, युनिट क. 2 यांचेकडुन अवैद्य घातक शस्त्रे बाळगणा-या एकुण तिन इसमांना ताब्यात घेवुन त्यांचे ताब्यातुन 3 घातक शस्त्रे चायना, खंजर चाकु व इतर साहित्य असा एकुण 71,540 रू चा मुद्देमाल जप्त…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, आगामी काळात अमरावती शहरामध्ये गणेशोस्तव, नवरात्र सारखे धार्मीक सार्वजनिक सन व उत्सव येत असुन या दरम्यान अमरावती शहरात कायदा व सुव्यवस्था राहावी तसेच गुन्हेगार व गुन्हेगारीवर प्रतिबंध व्हावा याकरीता पोलिस आयुक्त यांनी गुन्हेशाखा व पथकांना विशेष मोहीम राबविण्याबाबत आदेश दिले होते. त्या अनुषगांने पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे आदेशाने गुन्हे शाखा युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे मार्गदर्शनात गुप्त माहीती काढुन अमरावती शहरात घातक शस्त्रे बाळगणारे टोळीवर पाळत ठेवली.पोलिस आयुक्त.नविनचंद्र रेड्डी यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट 2 चे पथक हे पोलिस निरीक्षक, गुन्हेशाखा युनिट.2 यांचे मार्गदर्शनात आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गुप्त माहीती च्या आधारे दिनांक 31/08/2024 रोजी पोलिस स्टेशन बडनेरा व पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अंत्तर्गत्त वेगवेगळे दोन कार्यवाही करण्यात आली ते खालील प्रमाणे.
1) पोलिस स्टेशन सिटी कोतवाली परिसरातील बस स्टॉन्ड अमरावती ते रेल्वे स्टेशन रोडने दोन इसम हे कमरेला चायना चाकु लावुन मोटार सायकल ने फिरत आहे अशा माहीती वरून आरोपी 1) इरफान खान रेहमान खान वय 35 वर्ष, 2) असलम खान अहमद खान वय 25 वर्ष दोन्ही रा.नागपुरी गेट अमरावती यांना ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन 1) एक नग धारदार चायना चाकु, 2) एक नग धारदार खंजर, 3) दोन मोबाईल 4) एक मोटार सायकल असा एकुण कि.अं. 70,840/- रू चा मुद्देमाल मिळून आल्याने त्यांचे विरुब्द पो.स्टे.सिटी कोतवाली येथे कलम 4/25 शस्त्र अधिकनीगम सहकलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली आहे.
2) पोलीस स्टेशन बडनेरा परिसरातील मराठा चौक नवी वस्ती बडनेरा येथे एक इसम हा कमरेला चाकु लावुन फिरत आहे अशा माहीती वरून आरोपी गौरव किशोर जगदले वय 21 वर्ष रा.लढ्ढा प्लाट बडनेरा यास ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातून एक धारदार चायना चाकु कि.अं. 700/- रु चा मिळून आल्याने त्याचे विरूध्द पो.स्टे. बडनेरा येथे कलम 135 मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करून कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरच्या दोन्ही कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलिस उपाआयुक्त परीमंडळ १ गणेश शिंदे,पोलिस उपायुक्त परीमंडळ २ सागर पाटील,पोलीस उपायुक्त मुख्यालय कल्पना बारावकर,सहा पोलिस आयुक्त शिवाजी बचाटे गुन्हेशाखा, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनीट १ चे पोलिस निरीक्षक.बाबाराव अववार, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगाले, पोउपनि संजय वानखडे, अमलदार दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, मंगेश शिंदे, चेतन कराडे, संग्राम भोजने, संदिप खंडारे, नईम बेग, राजीक रायलीवाले, योगेश पवार, निलेश वंजारी, सागर ठाकरे, यांनी केली आहे.