ॲमॅझॅान गोडाऊन येथे चोरी करणारा सिटी कोतवाली पोलिसांच्या ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सिटी कोतवाली(अमरावती शहर) – सवीस्तर व्रुत्त असे की पोलिस स्टेशन  सिटी  कोतवाली, अमरावती शहर येथे, फिर्यादी मयुर भाउराव शिंदे वय 34 वर्ष लीगल कार्यकारी अधिकारी एनटेक्स ट्रान्सपोटेशन सर्विसेस प्रायव्हेट लिमीटेड यांनी दि. 22/05/2023 रोजी पो.स्टे ला येवुन तक्रार दिली की, यातील आरोपी

उत्कर्ष हरीभाऊ जवळकर वय 22 वर्ष रा. हनुमान नगर अमरावती





हा अमेझॉन गोडाउन मध्ये कामास असतांना त्याचे काम हे  माल लोंडींग अनलोंडींग व पार्सल स्कॅनिंगचे काम करत  होता यामध्ये 24 मार्च 2023 ते 26 एप्रील 2023 पर्यंत 19 मोबाईल व 1 घडयाळ अशा 20 वस्तु स्कॅन झाल्या नाही. असा मेल अॅमेझॉन कंपनीकडुन प्राप्त झाला त्यानुसार सर्व गोडाऊन मधील कर्मचारी यांनी विचारपुस करण्यात आली परंतु कोणीही उपयुक्त माहीती दिली नाही. करीता कंपनीने सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता नमुद आरोपी हा वेगवेगळ्या तारखेला चोरी करतांना दिसला. आरोपीने 19 मोबाईल व 1 घडयाळ अशा 20 वस्तु चोरून नेवुन कंपीनीचे 3,29,829/- रूपयाचे नुकसान केले अशा फीर्यादीचे रिपोर्टवरून सदर गुन्हा दाखल करण्यात आला होता
गुन्ह्याचा तपास करित असताना यातील अधिकारी व अंमलदार यांनी दि. 19/11/2023 रोजी बातमीदाराचे माहितीचे आधारे आरोपी नामे उत्कर्ष हरीभाऊ जवळकर वय 22 वर्ष रा. हनुमान नगर
अमरावती याला नमुद गुन्ह्यात अटक करून आरोपीला विचारपुस केली व आरोपीकडुन एक मोबाईल व त्याने अॅमझॉन गोडाऊन मधुन बिलासह चोरून आणलेले मोबाईल, मोबाईल शॉप मध्ये विकले ते मोबाईल सायबर क्राईमकडुन नमुद मोबाईलचे लोकेशन घेवुन ग्राहकांकडुन जप्त केले. असे एकुण 19 मोबाईल एकूण किं. 3,29,829/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. व गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कार्यवाही  पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अमरावती शहर, पोलिस उपायुक्त परीमंडळ – 2, विक्रम साळी,सहाय्यक पोलिस आयुक्त राजापेठ विभाग, शिवाजी बचाटे , वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजयकुमार वाकसे , पोलिस निरिक्षक (गुन्हे) विल्हेकर  यांचे मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. शशिकांत चिपडे,ना.पो.शि. मलिक अहेमद, अशिष ,प्रमोद, पोशी सागर यांनी केली यामध्ये सायबरचे
सहाय्यक पोनि  कासार व नापोशी सचिन यांनी सहकार्य केले.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!