खुनी हल्ला करुन लुटणारे सिटी कोतवाली पोलिसांनी केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

सिटी कोतवाली पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्ह्यांत खुनी हल्ला करुन लुटून जिवे मारण्याचा प्रयत्न करणारे आरोपी केले जेरबंद……..

अमरावती(प्रतिनिधी ) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अमरावती शहर येथे दि. 12/03/2024 रोजी फिर्यादी नामे सर्वेश राजेद्र काळबांडे वय 29 वर्षे रा वडगाव माहुरे अमरावती याने हे दिनांक 12/03/2024 रोजी दुध विक्री साठी मोटारसायकल ने रोज सकाळी 9.30 वा रेल्वे स्टेशन चौकाकडुन ईर्विन चौकाकडे दुध विक्री करुन आपल्या मोटर सायकलने जात  असताना आशिर्वाद वाईन शॉप या दुकानासमोरील डिव्हायडर वरुन तिन ते चार इसम रोड कॉस करीत असताना त्यांचे गाडीचा कट लागल्या मुळे काही अनोळखी ईसमांनी त्यांना  शिवीगाळ करुन गाडीच्या खाली ओढले व लाथाबुक्काने मारहान करुन त्यापैकी एका इसमाने त्याच्या जवळील चाकु काढुन मांडीवर व पोटावर मारुन जिवेमारण्याचा प्रयत्न केला .तसेच त्यातील एका आरोपीने त्यांचे पॅन्टचे खिशातुन बळजबरीने चार हजार रुपये काढुन घेतले असे फिर्यादिचे तोंडी    रिपोर्ट व मेडीकल रिपोर्टवरुन पोलिस स्टेशन सिटी कोतवाली अप 99/2024 कलम 307, 392,504, 506, 34 भादवि सह 135 म पो का गुन्हा दाखल करण्यात आला होता
सदर गुन्ह्याचा अनोळखी आरोपी असतांना सुध्दा कसोसिने तपास करुन आरोपीचा शोध घेवुन अधिकारी व अंमलदार यांनी दि. 15/03/20234 रोजी गुप्त बातमीदाराचे माहितीचे आधारे आरोपी 1)शंशीकात काटे वय 19 वर्षे रा. चिचफैल अमरावती





2)श्रेय राजु आवटे वय 19 वर्ष, रा पुष्पक कॉलणी अमरावती
यांना गुन्ह्यात अटक करून गुन्हा उघडकीस आणला.



तसेच पोस्टे ला फिर्यादी नामे शेख जुनेद शेख इब्राहिम वय 26 वर्ष, रा लालखडी अम दि 15/03/2024 चे 17.15 वा दरम्यान जयस्तंभ चौक येथे बब्बु मामु यास भेटण्यास आला असता तेथे त्याचे
ओळखीचा अनिल देशमुख भेटला व त्याने म्हटले की मला दारु पिण्यासाठी 100 रुपये मागीतले तर त्याने दिले नाही या कारणा वरुन आरोपीने अश्लील शिवीगाळ करुन जिवाने मारण्याची धमकी दिली व आरोपीने आपल्या खिशीतुन धारधार कटर काटुन उजव्या गालावर मारुन जिवाने मारण्याचा प्रयत्न केला असे फिर्यादिचेतोंडी रिपोर्ट वरुन  अप नं 104/2024 कलम 307, 294, 504, 506, (2) भादवि चा गुन्हा दाखल करुन तपास सुरु केला
सदर गुन्हातील आरोपी अनिल वामनराव देशमुख वय 54 वर्ष, रा गाडगेनगर अमरावती याला तात्काळ अटक करुन गुन्हा उघडकिस आणला



सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी  अमरावती शहर, पोलिस उपायुक्त परीमंडळ – 2 गणेश शिंदे, सहा पोलिस आयुक्त राजापेठ विभाग, जयदत्त भंवर, वरिष्ठ पोलिस निरिक्षक मनोहर
कोटनाके, पोलीस निरिक्षक (गुन्हे) ज्योती विल्हेकर यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि नरेश गिरघुसे , राणाप्रताप यादव सफौ रंगराव जाधव पोहवा मलिक अहेमद, रमेश निभोरकरप्रमोद हरणे,पोशि पंकज अंभोरे, स्वप्निल भारती, धिरज वानखडे, आकाश इंगोले, आंनद जाधव यांनी केली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!