
कुख्यात गुंड मामु याचेवर अमरावती गुन्हे शाखेची स्थानबध्दतेची कार्यवाही…
अमरावती शहरातील कुख्यात गुंड मामु उर्फे रमेश डिक्याव यांचेवर राजापेठ पोलिसांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती शहरातील कुख्यात गुंड अभिषेक उर्फ मामु रमेश डिक्याव वय 23 वर्ष रा. मेहरबाबा कॉलनी, जेवड नगर, अमरावती याचा सन 2019 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये सहभाग असतो त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन राजापेठ, फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे खुन, दरोडा बद्दल शिक्षा, मृत्यु किंवा जबर दुखापत घडवुन आणण्याचा प्रयत्नासहीत जबरी चोरी किंवा दरवडा, दुखापत करणे, मृत्यु किवा जबर दुखापत घडवुन आणण्याची धमकी, पुरावा नष्ट करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, शांतता भंग घडवुन आणण्याच्या उद्देशाने अपमान करणे, दोन किंवा अधीक व्यक्तींनी समान उद्देशाच्या पुरःसरणार्थ केलेल्या कृती, गृह अतिक्रमण करणे, प्राणघातक हत्यारानिशी सज्ज होवुन दंगा करणे, पन्नास रूपये इतक्या रकमेचे नुकसान करून आगळीक करणे, नुकसान करून आगळीक करणे, इतरांच्या व्यक्तीगत सुरक्षीतता धोक्यात येईल अशी कृती करणे, ईच्छापुर्वक दुखापत पोहचवण्याबद्दल शिक्षा, अग्णीशस्त्र बाळगणे, अधिसुचनांचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण 07 गुन्हे दाखल आहे.


त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कारवई करण्यात आलेले आहे. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय आहे.नमुद ईसमाविरूध्द वरीष्ठ पोलिस निरीक्षक, पोलिस ठाणे राजापेठ महेंद्र अंभोरे यांनी सहा पोलिस आयुक्त राजापेठ जयदत्त भवर ,पोलिस उपायुक्त परीमंडळ-2 गणेश शिंदे, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) कल्पना बारवकर यांचे मार्फतीने पाठविलेल्या प्रस्तावाची वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशासन गुन्हे शाखा सिमा दाताळकर यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेतील एम.पी.डी.ए. सेल मधील सपोनि इम्रान नायकवडे, पोलीस अंमलदार विनय गुप्ता, अजय मिश्रा, चेतन कराडे यांनी पुर्तता केली.

सदर प्रस्तावावर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिनांक 14/09/2024 रोजी आदेश पारीत केले.यावरुन वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पो.स्टे. राजापेठ यांनी आदेश तामिल करून त्यास स्थानबध्दतेच्या कालावधी करीता मध्यवर्ती कारागृह अमरावती येथे दिनांक 14/09/2024 ला दाखल करण्यात आले आहे. यापुढेही शहरातील सराईत गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. कायदयाखाली कारवाई करण्यात येणार आहे.



