हद्दपार आरोपीस अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती ग्रामीण हददीतील हद्दपार आरोपी राजीक शहा रशीद शहा यास गुन्हे शाखा युनीट १ ने अटक करुन उघड केले २ घरफोडीचे गुन्हे….

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती शहर हद्दीत घडलेले गुन्हे उघडकीस आणणेबाबत पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी,पोलिस उपआयुक्त परीमंडळ २
सागर  पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे यानी मार्गदर्शक सुचना केल्या होत्या त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट कं. 1 चे अधिकारी व पोलिस अमंलदार हे आयुक्तालयातील दाखल घरफोडीच्या गुन्हांचा संमातर तपास करत असताना त्याना गुप्त बातमीदारकडून माहीती प्राप्त झाली कि सुफीप्लॉट दर्यापुर जिल्हा अमरावती येथील रेकॉर्डवरील तळीपार आरोपी नामे राजीक शहा रशीद शहा वय 33 वर्षे रा. सुफी प्लॉट ता. दर्यापुर जिल्हा अमरावती हा अमरावती शहरात येवून घरफोडी सारखे गुन्हे करत आहे
सदर हददपार इसम याचे हालचालीवर गुप्त बातमीदारकडून पाळत ठेवली असता हददपार आरोपी नामे राजीक शहा रशीद शहा वय 33 वर्षे रा. सुफी प्लॉट ता. दर्यापुर जिल्हा अमरावती हा दिनांक 13/02/2024 रोजी 16.00 वा च्या दरम्यान वलगाव रोड धर्मकाटा या भागात आला असल्याची खात्रीशिर माहीती मिळाल्याने आरोपीला गुन्हे शाखा युनिट कं. 1 च्या अधिकारी व पोलिस अमलदारानी नवसारी रिंगरोड चौक जवळून ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यातून एक लोंखडी चाकू मिळून आल्याने व त्याने  पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांचे आदेशाचे उल्लंघल केल्याने त्याचे विरूदध पोलिस स्टेशन गाडगेनगर येथे अपराध कं 161 / 2024 कलम 142, मपोका सह
कलम 4 / 25 भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून त्याचे कडे अमरावती शहरात दाखल घरफोडीच्या गुन्हाबाबत सखोल तपास केला असता त्याचे कडून खालील गुन्हे
उघडकीस आलेले आहे.
1) पोलिस स्टेशन गाडगेनगर अपराध कं. 63 / 2024 कलम 457,380 भादवी
2) पोलिस स्टेशन राजापेठ अपराध कं. 980 / 2023 कलम 457,380 भादवी
सदरची कारवाई  पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेडडी सर,  पोलिस उपआयुक्त सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली युनिट कं. 01 चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, नाईक पोलीस अमंलदार दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस अंमलदार सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे चालक अमोल बाहदरपूरे, भुषन पदमणे, रोशन माहुरे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!