अमरावती पोलिस आयुक्तांच्या विशेष मोहीमे अंतर्गत तपासनी करतांना गुन्हे शाखा युनिट २ आढळले बरेच काही…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती शहर – सवीस्तर व्रुत्त असे की  पोलिस आयुक्त यांचे आदेशाने पोलिस आयुक्तालय हददी दिनांक १३/१०/२०२३ रोजी पो. नि. गुन्हे शाखा युनिट क्रमांक २ यांचे नेतृत्वात शहरामध्ये अवैध्दरित्या चालणारे कॅफे, हॉटेल, धाबे, दारू विक्री, अवैध्यरित्या शस्त्र बाळगणारे यांचेवर विशेष मोहीम राबवून खालील प्रमाणे कारवाई करण्यात आली.

१) बैल बाजार, जुनी वस्ती बडनेरा येथे आरोपी नामे मोहम्मद अनस शेख रउफ वय १८ वर्ष, रा. चमन नगर, जुनी वस्ती बडनेरा अमरावती हा मिळून आला त्याचे ताब्यातून १ चायना चाकू कि.अ. ३०० / -, २) एक एयर गन कि.अ. १०००/- रू असा एकूण १३०० रू चे शस्त्र मिळून आल्याने नमूद आरोपी विरूध्द पो.स्टे. बडनेरा येथे महाराष्ट्र पोलीस कायदा कमल १३५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
२) गावठी दारू विक्री करणा – या इसमांवर दारूबंदीच्या एकूण ३ कारवाई करून ३ आरोपीतांना ताब्यात घेवून त्यांचे ताब्यातून १३९००/- रू चा मुददेमाल जप्त करण्यात आला.
३) अवैध्दरित्या चालणारे ५ कॅफेवर अचानक धाड टाकून त्यापैकी २ कॅफेवर महाराष्ट्र पोलिस कायादयान्वये प्रतिबंधक कारवाई करण्यात आली.
४) बडनेरा जुना बायपास रोड वरील अवैध्दरित्या दारू पिण्याची व्यवस्था करूण देणा-या एकूण ८ धाब्यावर धाड टाकून पैकी ३ धाब्यावर पो.स्टे. बडनेरा येथे कलम ६८ म.दा.का प्रमाणे कारवाई करण्यात आली.





सदरची कारवाई पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेडडी ,पोलिस उपायुकत परिमंडळ १  सागर पाटील , सहायक पोलिस आयुक्त गुन्हे प्रशांत राजे  यांचे मार्गदर्शनाखाली, पोनि राहुल आठवले, गुन्हे शाखा युनिट क. २ यांचे नेतृत्वात सपोनि महेश इंगोले, पोउपनि
राजकिरण येवले, पोलीस अंमलदार राजेंद्र काळे, जावेद अहमद, दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, संग्राम भोजने, चेतन कराडे, राजीक रायलीवाले, योगेश पवार तसेच चालक संदिप
खंडारे यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!