
खंडनीच्या गुन्ह्यातील पाहीजे असलेला आरोपी,मोहम्मद खिजर यास धारदार शस्त्रासह गुन्हे शाखा युनीट १ ने केली अटक…
हल्ला करण्याच्या तयारीत असलेल्या व खंडनीच्या गुन्ह्यांत पाहीजे असलेला आरोपी मोहम्मद खिजर शहर गुन्हे शाखा युनिट १ कडुन जेरबंद….
अमरावती (प्रतिनिधी) – याबबत सवीस्तर व्रुत्त असे की,गुन्हे शाखा युनिट १ अमरावती शहर यांचेकडून दिनांक 18/01/2024 रोजी
पोलिस.स्टेशन,नागपुरी गेट हद्दीत चांदणी चौक येथे घडलेल्या खंडनीचा व त्यासंबंधी नागपुरी गेट पोलिस स्टेशन येथे यातील आरोपी मोहमद खिजर यांचे विरोधात भादवि कलम ३८५, २९४ ,५०६ब ४२७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता व सदर आरोपी हा फरार होता


आज दिनांक 18/01/2024 रोजी गुन्हे शाखा युनीट १ चे अधिकारी व कर्मचारी कडबी बाजार चौकी अमरावती शहर पोलिस स्टेशन नागपूरीगेट हददीमध्ये पेट्रोलीग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती मिळाली कि दिनांक १७/०१/२४ रोजी रात्री चांदणी चौक येथे दोन इसमानी गुन्हा केलेला आहे. सदर गुन्हातील फरार आरोपी मोहम्मद खिजर हा ट्रान्सपोर्ट नगर येथे फरशा घेवून फिरत आहे. व तो काणाली तरी मारण्याच्या तयारीत आहे.
सदर माहीतीवरून गुन्हे शाखा युनिट १ चे पोलिस अधिकारी व पथक यानी सापळा रचून गुप्त बातमीदारकडून मिळालेल्या माहीतीवरून सदर इसमास ताब्यात घेतले असता त्यानी त्याचे
नाव

मोहम्मद खिजर वल्द शेख हुस्नोददीन वय 35 वर्ष रा. आसीर कॉलनी मजीद जवळ पोलिस स्टेशन नागपूरी गेट अमरावती

असे सांगीतले सदर इसमाजवळून मिळून आलेल्या हत्यारासंबधाणे
पोलीस स्टेशन नागपूरीगेट येथे कलम ४,२५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असुन त्यास पुढील कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन नागपुरी गेट यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील कार्यवाही सुरु आहे
सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपायुक्त सागर पाटील,सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे
मार्गदर्शनाखाली युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक आसाराम चोरमले, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा राजूआपा, फिरोज खॉन, सतीष देशमूख, नाईक पोलिस अमंलदार
दिनेश नांदे, विकास गुडदे, पोलिस शिपाई सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, अमोल मनोहरे चालक भूषण पदमने, रोषन माहूरे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे


