
फ्रेजरपुरा हद्दीतील कुख्यात गुंड याचेवर पोलिस आयुक्तांची स्थानबध्दतेची कार्यवाही…
कुख्यात गुंड मोहीत उर्फ भय्यु याचेवर पोलिस आयुक्तांची MPDA कायद्यान्वये स्थानबध्दतेची कार्यवाही….
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
अमरावती शहरातील कुख्यात गुंड मोहीत उर्फ भैय्यु सुभाष सुर्यवंशी, वय 22 वर्ष, रा. लायब्ररी चौक, फेजरपुरा, अमरावती
हा सन 2021 पासुन गुन्हेगारी कार्यवाहीमध्ये लिप्त आहे. त्याचे विरूध्द पोलिस स्टेशन फ्रेजरपुरा, अमरावती शहर येथे अश्लील शिवीगाळ करणे, गृह अतिक्रमण करणे, जिवाने ठार मारण्याचा प्रयत्न करणे, सामाईक इरादा करणे, गंभीर दुखापत करणे, साधी दुखापत करणे, शिवीगाळ करून जिवाने मारण्याची धमकी देणे, घातक शस्त्र जवळ बाळगणे, हद्दपार आदेशाचे उल्लघंन करणे,
अधिसुचनांचे उल्लंघन करणे, अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण 13 गुन्हे दाखल आहे.


त्याचेवर यापुर्वी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आलेली आहे. तसेच त्यास तडीपार सुध्दा करण्यात आले होते तरी सुध्दा तो गुन्हेगारी क्षेत्रात सक्रीय आहे म्हनुन त्याचे विरुध्द वरीष्ठ पोलिस निरीक्षक मनिष बनसोड, पोलिस ठाणे फेजरपुरा, अमरावती शहर. यांनी सहा.पोलिस आयुक्त कैलास पुंडकर, फेजरपुरा विभाग व पोलिस उपायुक्त सागर पाटील, यांचे मार्फतीने पाठविलेल्या प्रस्तावाची सहा.पोलिस आयुक्त(गुन्हे) शिवाजी बचाटे, तसेच वरीष्ठ पोलिस निरीक्षक राहुल आठवले, गुन्हे शाखा मार्फत
पुर्तता केली.

सदर प्रस्तावावर पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी यांनी दिनांक 13/04/2024 रोजी आदेश पारीत केल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पो.स्टे. फ्रेजरपुरा यांचे मार्फत आदेश तामिल करून त्याचेवर स्थानबध्दतेच्या कालावधी करीता मध्यवर्ती, अमरावती येथे दिनांक 13/04/2024 ला दाखल करण्यात आले आहे. या पुढेही शहरातील अभिलेखावरील अवैद्य दारू विक्री करणारे व इतर गुन्हेगारांवर एम.पी. डी.ए.कायद्यान्वये कार्यवाही केली जाणार आहे.



