
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाचा गुटखा विक्रेत्यांवर छापा….
पोलिस आयुक्तांचे विशेष पथकाची (सि.आय.यु.)सुगंधीत तंबाखु गुटखा थोक विक्रेत्यांवर छापा टाकुन मोठी कार्यवाही,दोन आरोपींसह ९ लाखाचा माल केला जप्त…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,येनारे सन उत्सव,विधानसभा निवडनुक तसेच दोनच दिवसांआधी नागपुरी गेट पोलिस स्टेशनवर समाजकंटक लोकांनी केलेली दगडफेक यांच्या पार्श्वभुमीवर शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी आणि समाजकंटक लोकांना रसद पुरवणारे तसेच अवैध धंदे करणारे यांचेवर कार्यवाही करण्याचे आदेश पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी त्याचे विशेष सि.आय.यु. पथकास देण्यात आले होते


त्याअनुषंगाने दि. 06/10/2024 रोजी सि.आय.यु. पथक पो.स्टे. खोलापुरी गेट हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना 11.30 वा.चे दरम्यान गुप्त बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, साबनपुरा,अमरावती येथे श्रीनिवास राधाकीसन झंवर हा त्याच्या राहत्या घरुन शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुचा (गुटखा) घरुन अवैद्यरीत्या विक्री करीत आहे. अश्या खात्री लायक माहीतीवरुन माहीतीनुसार प्राप्त झालेल्या ठिकाणी जावुन पाहणी केली असता श्रीनिवास राधाकीसन झंवर हा दुकानात तसेच त्याच्या घरातील वरील मजल्यावर शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत तंबाखुचा (गुटखा)साठा मिळुन आला.

त्यास सदर प्रतिबंधीत गुटख्याबाबत विचारपुस केली असता त्याने सदरचा गुटखा त्याचे जवळ विक्री करणे करीता शेख चांद रा. बडनेरा अमरावती याने आणुन टाकले असल्याचे सांगीतले सदर ठिकानावरुन खालील प्रमाणे शासनाने प्रतिबंधीत केलेला सुगंधीत (गुटखा ) वेगवेगळ्या कंपनीचा (1) पान मसाला बाजीराव गोल्ड 2) पान रसीया पान मसाला (3) सुगंधीत तंबाखु मस्ताणी ब्रांड 4) पानमसाला नागपुरी प्रिमीयम 5) पान मसाला विमल 6)पान मसाला बाजीराव गोल्ड निळी 7) गुटखा नजर 9000 8) गुटखा नजर 5000 9) गुटखा नजर 1000 10) गुटखा नजर प्रिमीयम, 11) पान मसाला पान बहार 12) पान पराग प्रिमीयम पान मसाला 13) पान मसाला जॅकपॉट 777 14) पान मसाला विमल झिपर 15) सुगंधीत तंबाखु V1 असा एकुन 9,01,960/- रु. चा माल जप्त करण्यात आला असुन अन्न सुरक्षा अधिकारी गजानन वा. गोरे यांच्या लेखी तक्रारीवरुन प्रतिबंधीत अन्न पदार्थाची विक्रीकरीता साठवणुक केल्याने आरोपी 1) श्रीनिवास राधाकीसन झंवर 2) शेख चांद रा. बडनेरा अमरावती यांच्या विरुद्ध अन्न सुरक्षा व मानव कायदा 2006 चे कलम 59 तसेच भारतीय न्याय सहीता कलम 223,274,275,123 अन्वये पोलीस स्टेशन खोलापुरी गेट अमरावती शहर येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त(परीमंडळ २) गणेश शिंदे, वरीष्ठ पोलिस निरीक्षक गौतम पाथारे यांच्या मार्गदर्शनात विशेष पथकातील मधील प्रभारी स.पो.नि. महेन्द्र इंगळे, सफौ विनय मोहोड, पोहवा सुनिल लासुरकर, जहीर शेख, नापोशि अतुल संभे,पोशि राहुल देंगेकर, विनोद काटकर यांनी केली आहे.


