दोन अट्टल चोरटे गाडगेनगर पोलिसांचे ताब्यात…
दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी केली अटक…
अमरावती (शहर प्रतिनिधी) – जिल्हा स्टेडीयम येथे पोलिस भरती सरावासाठी येणाऱ्यांच्या बॅग मधील मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गाडगेनगर पोलिसांनी मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून 1) सॅमसंग गॅलक्सी एम ओ 2 एस कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/-रू. 2) रिअलमी 8 आय कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/-रू. 3) काळया रंगाची युनिकॉन क्र. एम एच 27 सी एस 6383 कि.अं. 50000/- रु. असा
एकुण 70000 /- रु. माल व दुस-या गुन्हयात 1) ओप्पो केया मोबाईल कि.अंदाजे 15000/रु. 2) रेडमी कंपनीचा मोबाईल कि.अंदाजे 10000/- रु. आदी मुद्देमाल हा जप्त केला आहे.
या प्रकरणी फिर्यादी – रोहन रविंद्र डाखोरे (वय १८ वर्षे) रा. कु-हा अमरावती, राहुल बाळु बांगडकर (वय २९ वर्षे) रा.धाता, नांदगाव खंडेश्वर, दिनेश रतनलाल माधवानी रापरी कॅप्प अमरावती यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गाडगेनगर पोलिस ठाण्यात 1288/23 क.379 भादवि आणि अप 372/24 क.379 भादवि 374/2024 कलम भादवी 392 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या बाबत अधिक माहिती अशी की, गाडगेनगर पोलीस स्टेशन अमरावती शहर येथे 1288/23 क.379 भादवि व अप क्र.372/24 क.379 भादवि प्रमाणे गुन्हे दाखल असुन सदर गुन्हयाची थोडक्यात हकीकत येणेप्रमाणे की, यातील दोन्ही फिर्यादी जिल्हा स्टेडीयम अम येथे पोलिस भरती प्रॅक्टीस करीता येत होते. त्यांचे बॅग मध्ये ठेवलले मोबाईल आरोपीने चोरी केले असुन तसेच फिर्यादीची पार्किंग मधील गाडी आरोपीने वर नमुद घटनेच्या ठिकाणी चोरी केली असुन फिर्यादीचे रिपोर्ट वरून गुन्हा नोंद करण्यात आला होता. गुन्हयात गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहीतीवरून व सायबर पोलिस ठाणेच्या सहकार्याने आरोपी मिळुन आल्याने गुन्हयात अटक करण्यात आली आहे. त्याच्याजवळुन गुन्हयातील गेलेला माल जप्त करून 2 गुन्हेउघडकीस करण्यात आले.
तसेच फिर्यादी हे फोनवर बोलत असताना इरविन चौक येथे त्यांचा मोबाईल हिसकावुन नेला यावरून पोलिस ठाणे येथे 374/2024 कलम 392 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल होता आरोपी विजय नरेश ढोके (वय 25 वर्षे), रा.रमाबाई आंबेडकर नगर अमरावती यास गुप्त बातमीदाराचे मार्फतीने माहीती काढुन अटक करून गुन्हयातील 2 मोबाईल जप्त करून 25 हजार रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अशा प्रकारे तपास पथकाने 3 गुन्हे उघडकीस आणून दोन्ही आरोपीकडुन एकूण 95000/- रु. चा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगीरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, पोलिस उपायुक्त परीमंडळ 1, सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त गाडगेनगर विभाग अरुण पाटील वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंत गिरमे पो.स्टे. गाडगेनगर यांच्या मार्गदर्शनाखली डी.बी. पथक प्रमुख पोउपनि टी.एम ढाकुलकर, स्टाफ पोहवा सुभाष पाटील पोहवा. दुलाराम देवकर, नापोशि.सचिन बोरकर, पोशि. सुशांत मतीन, महेश जयसेन यांनी केली आहे.