गुन्हे शाखा युनीट १ ची कोतवाली हद्दीत अवैध हुक्का पार्लरवर छापा….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

गुन्हे शाखा युनीट १ ने अवैधरित्या चालणार्या  हुक्का पार्लरवर छापा टाकुन साहीत्यासह ४ आरोपींना घेतले ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस आयुक्त नवीनचंन्द्र रेड्डी यानी अमरावती शहरामध्ये शाळा कॉलेज व इतर ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थाची विक्री तसेच अमंलीपदार्थ बाळगणारे, विकणारे तसेच सेवन करणा-या लोकांविरुध्द धडक मोहीम राबविण्याबाबत आदेशीत केले आहे तसेच अमरावती आयुक्तालयातील अधिकारी व अमंलदार याचे मार्फतीने समाजातील युवावर्ग यांना नशामुक्त करण्याबाबत प्रयत्नशील असून त्याबाबत शाळा कॉलेज व इतर गर्दीच्या ठिकाणी बैठकी व कार्यशाळा घेण्यात येत आहे एक सशक्त व सुदृढ समाज निर्माण होवून युवावर्ग याचेपासून दूर राहावा याबाबत प्रयत्नशील आहे.





त्याअनुषंगाने पोलिस आयुक्त यांचे आदेशान्वये गुन्हे शाखा युनिट १ चे अधिकारी व अंमलदार हे पोलिस स्टेशन कोतवाली भागात पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदाराकडून माहीती प्राप्त झाली की “साक्षी कॅफे अॅन्ड रेस्टॉरंट, रायली प्लॉट अमरावती येथे तंबाखूजन्य पदार्थाचे हुक्का पार्लर मार्फत सेवन सुरू आहे.सदर माहीती वरिष्ठ अधिकारी याना देवून सदर माहीतीची खात्री करुन ती खरी असल्याने पंचासमक्ष साक्षी कॅफे अॅन्ड रेस्टॉरंट, रायली प्लॉट अमरावती येथे दुस-या माळ्यावर जावून छापा कार्यवाही केली असता साक्षी कॅफे अॅन्ड रेस्टॉरंट चे मालक १) प्रणव प्रमेद्र शर्मा वय २६ वर्ष रा रायली प्लॉट अमरावती याने धुम्रपान/सेवनाकरिता तंबाखुजन्य पदार्याची विकी व सेवन करण्यास सहाय्य करतांना विनापरवाना मिळुन आला.



तसेच हुक्का पिणारे नामे २) मोहीत सुनीलकुमार फलवाणी वय २१ वर्ष रा. कृष्णा नगर ३) प्रथमेश मनोजराव मसांगे वय १८ वर्ष रा. गाडगेनगर अमरावती ४) पियुष सुनील बसतंवाणी क्य २१ वर्ष रा कृष्णा नगर अमरावती हे पिताना मिळून आले.यातील



आरोपी क्र १) प्रणव प्रमेद्र शर्मा याचे ताब्यातून १) २,१००/- रू हुक्का पॉट नळीसह ३ नग २) १००/- रू. अफजल कंपनीचा पानरस फ्लेअर चे छोटे पॉकीट ३) ४५०/- रू. अल अयान कंपनीचा फॅलेवरचा एक डब्बा अर्थवट संपलेला ४) ४५०/- रू.अल फैज कंपनीचा फॅलेवरचा एक डब्बा अर्धवट संपलेला ५) १००/- रू. मॅजिक कोल पॅकीट थे ६ नग असा एकून  ३२००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.वरिल आरोपींचे हे कृत्य कलम ४, ७, २० व २१ सिगारेट आणि इतर तंबाखु उत्पादणे (जाहिरातीस प्रतिबंध आणि व्यापार व वाणिज्य व्यवहार आणि उत्पादन पुरवठा व वितरण यांचे वियमन) अधिनियम २००३ प्रमाणे होत असल्याने त्याना व मुददेमाल ताब्यात घेवून पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी पोलिस स्टेशन सिटी कोतवाली यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पोलिस आयुक्त, नवीनचन्द्र रेड्डी, पोलिस उपआयुक्त कल्पना बारवकर (मुख्यालय), सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे) शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शना खाली युनिट १ चे वरिष्ठ पोलिस निरिक्षक गोरखनाथ जाधव, सपोनि मनीष वाकोडे, पोउपनि प्रकाश झोपाटे, पोहवा फिरोज खॉन, सतिष देशमुख, अलीमउददीन खतीब, नाईक पोलिस शिपाई विकास गुडदे, पोलिस शिपाई सुरज चव्हाण, निखील गेडाम, अमोल मनोहरे चालक , रोशन माहुरे, किशांर खेंगरे यानी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!