संशईतांना ताब्यात घेऊन युनीट २ उघड केले घरफोडीचे ४ गुन्हे,१० लक्ष रु चा मुद्देमाल केला हस्तगत…
अट्टल घरफोडी करणारे ३ आरोपी यांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखा युनिट २ ने ४ गुन्हे उघड करून एकुण १०,३७,०००/- रूपयाचा मुद्देमाल केला जप्त…..
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि(०६) अॅाक्टोबर २०२३ रोजी यातील फिर्यादी विजय विश्वेश्वर चौधरी रा. भिवापुर लेआउट महेश भवन चे मागे अमरावती यांनी तक्रार दिली की, दिनांक ०६/१०/२०२३ रोजी ११:५० वा दरम्यान घराला कुलुप लावुन ईलेक्ट्रीक बिल भरण्याकरीता गेले व १३:३० वा घरी परत आले असता कोणी तरी अज्ञात चोरट्याने घराचे मागील दरवाज्याचे कडीकोंडा तोडुन आत प्रवेश करून सोन्याचे दागीने वजन अंदाजे २०० ग्राम व चांदीचे भांडे, ताट, वटी, ग्लास वजन अंदाजे ८० ग्राम असा एकुण २,६७,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला यावरून पो.स्टे. राजापेठ अमरावती शहर येथे
अपराध क्र. ८८६/२०२३ कलम ४५४, ३८० भादवि चा गुन्हा नोंद करण्यात आला होता व तपास सुरु होता
पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांचे निर्देशान्वये आयुक्तालय हद्दीत घरफोडी चे गुन्हयांना आळा बसावा आणि गुन्हे उघडकिस यावे त्याकरीता त्यांचे आदेशान्वये सदरचा समांतर तपास गुन्हेशाखा करीत असतांना युनीट २ चे पोलिस निरीक्षक बाबाराव
अवचार यांचे आदेशाने युनिट क्र. २ येथील पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी सदर गुन्हयातील फरार आरोपीबाबत गुप्त बातमीदार नेमले.सदर गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना यात १) अक्षय दिनेशकुमार गुप्ता वय २५ वर्ष रा. चनकापुर,
नागपुर शहर, २) चेतन मनोज बुरडे वय २३ वर्ष रा. नंदनवन, नागपुर, ३) शुभम श्रीधर डुंबरे वय ३० वर्ष रा. नंदनवन नागपुर यांना सदर गुन्हयात निश्पन्न करुन त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस केली असता त्यांनी सदर गुन्हा व इतर ३ गुन्हे असे एकुण ४ गुन्हे केल्याची कबुली दिल्यावरून त्यांना अटक करुन त्यांचे ताब्यातुन
एकुण १४७ ग्राम सोन्याचे लगड व ५० ग्राम चांदीची लगड एकुण कि.१०,३७,०००/- रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला व पोलिस स्टेशन राजापेठ व पोलिस स्टेशन बडनेरा येथील गुन्हे उघड करण्यात आले
सदरची कारवाई पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त
कल्पना बारावकर, पोलिस उपायुक्त सागर पाटील,पोलिस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलिस आयुक्त गुन्हेशाखा, शिवाजी बचाटे, गुन्हे शाखा युनीट २ चे वरीष्ठ पोलिस निरीक्षक बाबाराव अवचार यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि महेश इंगाले, सत्यवान भुयारकर, पोउपनि संजय वानखडे,पोलिस अंमलदार मंगेश शिंदे, संग्राम भोजने, नईम बेग, चेतन कराडे, योगेश पवार, निलेश वंजारी, अमर कराळे, सागर ठाकरे, राजीक रायलीवाले, संदीप खंडारे यांनी केली आहे.