
अवैध शस्त्र बाळगणार्या विरोधात युनीट २ ची विशेष मोहीम…
अवैध घातक शस्त्रे बाळगणा-यावंर गुन्हे शाखा युनीट २ ने विशेष मोहीम राबवुन आरोपीच्या ताब्यातुन ४ शस्त्रे केली जप्त…
अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी अमरावती शहर यांनी दिलेल्या सुचनेनुसार गुन्हेशाखा युनिट २ पथक अमरावती शहर हे पोलिस निरीक्षक, राहुल आठवले, गुन्हेशखा युनिट – २ यांचे आदेशाने दिनांक १५/०३/२०२४ रोजी पोलिस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की पो.स्टे. फ्रेजरपुरा येथुन तडीपार असलेला इसम राहुल गौतम श्रीरामे रा. राहुल नगर,
अमरावती हा त्याचे राहते घरा समोर कमरेला लोखंडी खंजर असे घातक शस्त्र घेवुन उभा आहे अशा माहीती वरून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन एक लोखंडी खंजर कि १२००/- रू चा जप्त करण्यात आला. नमुद आरोपी हा पो.स्टे. फ्रेजरपुरा येथून ८ महीन्याकरीता तडीपार असतांना सुध्दा त्याने अवैध्दरित्या शहरामध्ये प्रवेश करून लोखंडी खंजर घेवून मिळून आल्याने त्याचे विरूध्द पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे कलम ४ / २५ आर्म अॅक्ट सहकलम १४२, १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


तसेच दिनांक १६/०३/२०२४ रोजी पोलिस आयुक्तालय हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना गोपनिय माहीती मिळाली की गणेश किसनराव लादे रा. यशोदा नगर, अमरावती याने त्याचे राहते घरामध्ये शस्त्रे ठेवली आहे. अशा माहीती वरून नमुद आरोपीस ताब्यात घेवुन त्याचे ताब्यातुन दोन लोखंडी तलवारी, एक सत्तुर एकुण कि.४,०००/- रू ची जप्त करण्यात आले नमुद आरोपी विरूध्द पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे कलम ४ / २५ आर्म अॅक्ट सहकलम १३५ मपोका प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस आयुक्तालय हद्दीतील पो.स्टे. फ्रेजरपुरा हद्दीमध्ये अवैध्य दारू विक्री करणा-यावर मोहीम राबवुन ५ आरोपीतांवर हातभट्टी दारू विक्रेतांवर प्रोव्हीबिशन रेड करून त्यांचे ताब्यातुन ७,५००/- रू चा माल जप्त करून त्यांचे विरुध्द पो.स्टे. फ्रेजरपुरा येथे कलम ६५ (फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदया अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पोलिस उपायुक्त सागर पाटील पोलिस उपायुक्त गणेश शिंदे साहेब, सहाय्यक पोलिस आयुक्त, गुन्हे शाखा शिवाजी बचाटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखेचे पोलिस निरीक्षक राहुल आठवले, यांचे नेतृत्वाखाली सपोनि महेश इंगोले, पोउपनि संजय वानखडे, पोलिस अंमलदार राजु काळे, जावेद अहमद,दिपक सुंदरकर, गजानन ढेवले, एजाज शहा, चेतन कराडे, संग्राम भोजने, मंगेश शिंदे, नईम बेग, निलेश
वंजारी, राजीक रायलीवाले, योगेश पवार, संदीप खंडारे यांचे पथकाने केली आहे.



