घरकाम करता करता मालकिणीच्या किंमती दागीण्यांवर मारला डल्ला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

गाडगेनगर(अमरावती शहर)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की
पोलिस ठाणे गाडगेनगर हद्दीत श्रीमती सुरेखाताई दिगाबर लुंगारे, भाजपा नगरसेविका रा. कांतानगर, अमरावती ह्या त्यांची
बहिण श्रीमती पद्मा महल्ले यांचेसह घरी असतांना दिनांक ११.१०.२०२३ रोजी दुपारी ०१.३० वा चे दरम्यान त्यांचे पर्समधील
सोन्याची ३.५० ग्रॅम अंगठी, २३ ग्रॅम वजनाचा सोन्याची चैन, तसेच ड्रेसिंग टेबलवर ठेवलेली एक हिन्याची अंगठी व ०१ ते २.५ ग्रॅमची सोन्याची अंगठी, तसेच ४०००/-रु रोख रक्कम असे एकुण मुद्देमाल २,४३,०००/-रु ऐवज चोरीस गेल्याची तक्रार दिली असता त्यावरुन पोलिस ठाणे गाडगेनगर येथे अप क्रं. १२५५/२०२३ कलम ३८१ भादंवि अन्वये दिनांक १२.१०.२०२३ रोजी दाखल करण्यात आला होता त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास तांत्रिक व शास्त्रोक्त पध्दतीने करुन फिर्यादीचे घरी येणारे जाणारे यांचेबाबत सखोल चौकशी करुन संशयीत असलेली घरकाम करणारी महिला संध्या चापळकर हिचे बाबत गोपनियरित्या बातमीदारांकरवी माहिती संकलित केली. तसेच तिच्या संपर्कात असणारे यांचेविषयी माहिती घेवून गोपनिय चौकशी केली व खात्री पटल्यानंतर सदर संशयीत
महिला

संध्या विजय चापळकर वय ४० वर्ष, रा.वडरपुरा, अमरावती





हिला दिनांक १४.११.२०२३ रोजी अटक केली. या गुन्हयात तीला चोरी केलेले मौल्यवान दागीने विक्री करण्यास मदत करणारा



अनिस अहमद गुलाम गिलानी, वय ४२ वर्ष, रा. मुस्तफा नगर, हैदरपुरा अमरावती



यास सुध्दा ताब्यात घेण्यात येवून त्यांचेकडुन चोरीस गेलेला एकुण २,४३,०००/- (अक्षरी दोन लक्ष त्रेचाळीस हजार रुपये) रु.चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदर मुद्देमालापैकी चोरीस गेलेली मौल्यवान हिऱ्याची अंगठी ही जशीच्या तशी हस्तगत करण्यात यश मिळाले आहे.
सदर संपूर्ण कार्यवाही  पोलिस आयुक्त  नविनचंद्रजी रेड्डी (भापोसे.),  सागर पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-०१,  कैलास पुंडकर, सहायक पोलिस आयुक्त गाडगेनगर विभाग, यांचे मार्गदर्शनाखाली  गजानन गुल्हाने,वरीष्ठ पोलिस निरीक्षक पोलिस ठाणे गाडगेनगर याचे नेतृत्वात गुन्हे शोध पथकाचे पोलिस उपनिरीक्षक  गणेश राऊत, पोहवा सुभाष पाटील,आस्तिक देशमुख ,पोना. गजानन बरडे  पोकॉ. सुशांत प्रधान ,प्रशांत वानखडे, पोकॉ. सागर धरमकर ,जयसेन वानखडे ,चालक पोहवा जाकिर खान यांनी केली





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!