नायब तहसीलदार यांचे घरी घडलेल्या जबरी चोरीचा ४८ तासाचे आत केला उलगडा..

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अमरावती येथील नायब तहसीलदार यांचे घरी देशी कट्टा (गावठी पिस्तुल) व चाकुचा धाक दाखवुन मारहान करून जबरी चोरी करणारे ५ आरोपी गुन्हे शाखेच्या ताब्यात…

अमरावती(शहर प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
दि. ३०/०१/२०२४ रोजी दुपारी नायब तहसीदार यांच्या पत्नी यांनी तक्रार दिली की, सकाळी त्यांचे पती ऑफिसला निघुन गेल्या नंतर ११:०० वा दरम्यान दोन अनोळखी व्यक्ती हे तोंडाला मारक व
दुपट्टा बांधुन जनगणनेची नोंदणी सुरू आहे असे खोटे सांगुन घरात प्रवेश केला व  फिर्यादी घरात एकटी असल्याचे खात्री करून
फिर्यादीचे गळयाला चाकु लावुन व देशी कट्टाचा धाक दाखवुन फिर्यादीस रेलींगला बांधुन फिर्यादीचे घरातील कपाटातील
नगदी ७०००/- रू व हातातील सोन्याचे बांगळ्या ६० ग्राम व गळयातील मिनी मंगळसुत्र २० ग्रॅम असा एकुण ५,०३०००/-
रूचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला अशा फिर्यादीने दिलेल्या तक्रारी वरून अज्ञात आरोपीविरुध्द पोलिस स्टेशन, गाडगेनगर
अमरावती शहर येथे अपराध क्रमांक १०७/२०२४ कलम ३९४, ३४ भा.द.वि. प्रमाणे गुन्हा नोंद केला होता
सदर गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने पोलिस आयुक्त  नविनचंद्र रेड्डी  यांनी गुन्हेशाखा व शहरातील सर्व पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथके, सायबर शाखा असे वेगवेगळे १० पथक तयार करून सदर गुन्हा उघडकिस आणण्याबाबत मार्गदर्शन केले होते यानुसार वेगवेगळ्या पथकाने वेगवेगळ्या दिशेने कौशल्यपुर्ण तपास सुरु होता
नमुद गुन्हयाचा संमातर तपास करीत असतांना गुन्हेशाखा, युनिट १ यांना दि. २४ रोजी गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की गुन्हयातील मुख्य आरोपी





(१) दिपक रमेश इंगोले वय ४० वर्ष रा. रद्दीपुरा,पाली यांचे घरी चपराशीपुरा, अमरावती



हा महसुल विभागात कंत्राटी चालक म्हणून काम पाहत होता तो यापुर्वी बरेच वेळा फिर्यादी तहसीलदार यांचे घरी खाजगी वाहनावर चालक म्हणुन गेला होता त्याला घरातील व्यक्ती व घराचे इमारती बाबत  संपुर्ण माहीती होती याचाच फायदा घेवून त्यांने त्याचा मित्र (२) उमेश उत्तमराव गवई वय ३५ वर्ष रा. मोजखेडा पो.स्टे. चांदुर बाजार जि. अमरावती ह.मु. शेगांव दिपक वानखडे यांचे घरी



यांचेसोबत सोबत भेटुन संगनमताने  पैसा लुटण्याकरीता कट रचला. त्यासाठी त्यांनी  त्यांचा एक मध्यप्रदेशातील साथीदार

(३) विनोद छोटेलाल सोनेकर वय ३७ वर्ष रा. बडचितोली तहसील पांढुरणा जि. छिंदवाडा राज्य मध्यप्रदेश

गुन्हेशाखा व पोलिस स्टेशनचे गुन्हे प्रकटीकरण पथक, सायबर शाखा असे वेगवेगळे पथकाने पो.स्टे. गाडगेनगर येथील अप. क्र. १०७/२०२४ कलम ३९४, ३४ भा.द.वि. च्या गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्याने सतत २ दिवस पाठपुरवा करून तसेच सिसिटीव्ही फुटेज व तांत्रीक पुरावे उपलब्ध नसतांना देखील सलग ४८ तास वेगवेगळ्या ठिकाणी पथके नेमुन आरोपींवर सापळा रचुन अतिशय शिताफिने व कौशल्यपुर्णपणे आरोपी यांना ताब्यात घेतले

यातील मुख्य आरोपी दिपकइंगोले व विनोद सोनेकर हे त्याचे होन्डा युनिकॅार्न वाहनाने फिर्यादी याचे घरी गेले त्यावेळी आरोपी उमेश गवई हा घराचे बाहेरून त्यांना वेळोवेळी फोनवर माहीती पुरवित होता. दोन आरोपी यांनी फिर्यादीचे पती ऑफिसला निघुन गेल्या नंतर जनगणनेची नोंदणी सुरू आहे असे खोटे सांगुन घरात प्रवेश करून त्यांची पत्नी  घरात एकटी असल्याचे खात्री करून तिचे गळयाला चाकु लावुन व देशी कट्ट्याचा धाक दाखवुन तिला रेलींगला बांधुन घरातील कपाटातील नगदी ७०००/- रू व हातातील सोन्याच्या बांगड्या ६० ग्राम व गळ्यातील मिनी मंगळसुत्र २० ग्रॅम असा एकुण ५,०३०००/- रू अशी कबुली आरोपींनी  दिली. तसेच गुन्हयात वापरलेले गावठी बनावटी देशी कट्टा (पिस्तुल) हे

(४)महेंद्र विठोबा निवाडे वय ४० वर्ष रा. करजगांव ता. वरूड जि. अमरावती

याने पुरविला होता. यास करजगांव येथुन ताब्यात घेतले.

आरोपी क्र. (५) पंकज रामप्रसाद यादव वय ३४ वर्ष रा. भानखेडा जि. अमरावती

याने गुन्हयातील चोरी गेलेले ८० ग्रॅम सोने विकण्याकरीता मदत केली आहे अशा प्रकारे कबुली दिली असुन सदर गुन्हात आरोपींना ताब्यात घेवून त्यांना विश्वासात घेवून कसोशिने व बारकाईने विचारपुस सुरू आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त नविनचंद्र रेड्डी,पोलिस उपायुक्त परीमंडळ- १ सागर पाटील,सहायक पोलिस आयुक्त गुन्हे शिवाजी बचाटे  यांचे मार्गदर्शनाखाली, पोलिस निरीक्षक आसाराम चोरमोले, गुन्हे शाखा अमरावती शहर, यांचे नेतृत्वाखाली सपोनि इंगोले, मनिष वाकोडे, अनिकेत कासार, पोउपनि राजकिरण येवले,
प्रकाश झोपाटे, पोलिस शिपाई सतिश देशमुख, राजुअप्पा बाहेनकर, फिरोज खान, राजेंद्र काळे, विकास गुळदे, जावेद अहेमद, दिपक सुंदरकर, गजानन ठेवले, निदेश नांदे, संग्राम भोजने, चेतन कराडे, अमोल मनोहरे, राजीक रायलीवाले,सुरज चव्हाण, निखील गेडाम, निवृत्ती काकड, रोशन निसंग, मंगेश परीमल, किशोर खेंगरे, रोशन माहुरे, भुषन पदमणे,अमोल बहादुरपुरे, यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!