
माहुली येथील बेवारस मुतकाचा खुनी अखेर स्थागुशा पथकाच्या ताब्यात…
माहुली येथील खुनाच्या गुन्हयातील आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेने केली अटक…
अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक १/२/२४ रोजी पो.स्टे. माहुली हद्दीतील ग्राम चिचखेड येथील पोलिस पाटील विजय चांगोले, वय ५५, रा. चिचखेड यांनी दिनांक ०१/०२/२०२४ चे दुपारी ०१.०० वा दरम्यान पोलिस स्टेशन. माहुली येथे कळविले की, माहुली ते मोर्शी रोडवरील ग्राम चिचखेड
प्रवासी निवा-यामध्ये एक अनोळखी इसमाचा मृतदेह बेवारस स्थितीत पडुन आहे. प्राप्त माहीती वरून पो.स्टे. माहुली येथील
अधिकारी व अमंलदार यांनी घटनास्थळी जावुन पाहणी केली व मृतदेह शवविच्छेदन करणे करीता जिल्हा सामान्य रूग्णालय, अमरावती येथे पाठविण्यात आला होता व घटनेचे अनुषंगाने अकस्मात मृत्युची नोंद घेण्यात आली होती.
मयताची ओळख पटविण्या करीता आजुबाजुचे गावात नागरीकांना मृतदेहाचे छायाचित्र दाखविले असता सदर इसम हा ग्राम डवरगांव येथील आकाश ऊर्फ बंडु तायडे, वय २२ हयाचे असल्याचे निष्पन्न झाले. मृतकाचे आईला विचारपुस केली असता तीने सांगीतले की, दि. ३१/०१/२०२४ रोजी आकाश (मृतक) हा आपले मित्रांसोबत कामानिमीत्त मोटार सायकलने सकाळी बाहेर गेला होता तसेच त्याच दिवशी सायंकाळी मृतक हयाचा भाऊ मनिष तायडे याने मृतक यास डवरगांव चौकात पाहीले असल्याचे सांगीतले, मृतक आकाश त्या दिवशी (दि. ३१/१/२४) घरी परत आलाच नाही. दि.०१/०२/२०२४ रोजी सायंकाळी पोलिसांव्दारे माहीती मिळाली की त्यांचा मुलाचा मृतदेह मिळुन आला आहे. आकाश (मृतक) चे आईने आपले अज्ञात व्यक्तीने माझ्या मुलाचा खुन केला असल्याचे नमुद केले आहे.
सदर घटनचे गांभीर्य पाहता घटनास्थळी वरीष्ठ पोलिस अधिकारी यांनी तात्काळ भेटी दिल्या व गुन्हा उघडकीस आणण्याचे दृष्टीने विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.पंकज कुमार कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीण यांनी मार्गदर्शन करून स्थानिक गुन्हे शाखा येथील एकुण २ पथके तयार करण्यात आली होती. तपास पथकाने समांतर तपास करित असतांना गुप्त बातमीदाराकडुन प्राप्त माहीतीचे आधारे व परिसरात केलेल्या
विचारपुस वरून आरोपी


प्रणित भाष्कराव जंवजाळ, वय ३२, रा. बेलोरा

व मृतक याचे दि. २७/०१/२०२४ रोजी डवरगांव फाटयावर गाडीला कट मारल्याच्या कारणावरून वाद झाला होता त्यावेळी मृतक याने आरोपीस शिविगाळ व मारहाण केली होती अशी माहीती प्राप्त झाली. वरून आरोपी प्रणित भाष्कराव जंवजाळ, वय ३२, रा. बेलोरा यास ताब्यात व विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने खुनाची कबुली दिली कि, त्याचे व मृतकाचे दि. २७/०१/२४ रोजी झालेल्या वादाचा आकस मनात धरून आरोपीने दि. ३१/०१/२४ रोजी मृतक यास दारू पिण्याचे बहाण्याने चिचखेड फाटयाजवळ मोटार सायकल वर बसवुन घेवुन गेला व मृतकास दारू पाजली व त्यानंतर कमरेच्या बेल्टने व बांबुच्या काठीने मृतक यास मारहाण केली व त्यास तेथेच सोडुन आरोपी हा गावी परत गेला त्यातच त्याचा मृत्यु झाला.
सदरची कार्यवाही विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.,सुर्यकांत जगदाळे, उप विभागीय पोलीस अधिकारी यांचे मार्गदर्शनात किरण
वानखडे, पो.नि.स्था. गु.शा., विष्णु पांडे, ठाणेदार, पो.स्टे. माहुली, पो.उप.नि. नितीन चुलपार, पो. अमंलदार बळवंत दाभणे, सचिन
मिश्रा, रविन्द्र बावणे,पंकज फाटे, भुषण पेठे, हर्षद घुसे यांचे पथकाने केली आहे.



