
अमरावती येथील सहाय्यक पोलिस निरीक्षक यांना क्षणाचाही विलंब न करता प्राथमिक उपचारासाठी रुग्नालयात नेणार्या सदग्रुहस्थांचा पोलिस आयुक्तांनी केला सत्कार….
अमरावती- सवीस्तर व्रुत्त असे की दिनांक ०५.११.२०२३ रोजी सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रियंका विवेक कोटावार या नेहमी प्रमाणे पोलिस स्टेशन राजापेठ येथे आपल्या कर्तव्यावर जाण्याकरीता निघाल्या असतांना टिप्पर क्रमांक एम.एच २७ एक्स ८८७१ चे चालकाने आपला टिप्पर भरधाव वेगाने चालवुन श्रीमती प्रियंका विवेक कोटावार यांचे स्कूटी क्रमांक एम एच २७ बिएन ४७१४ ला समोरून धडक देवुन गंभीर जखमी केले.त्याचक्षणी तिथून जाणारे साईड इंजिनिअर श्री. विवेक मोहन काकड हे बियाणी चौक येथे घडलेल्या अपघाताचे वेळी देवदुता सारखे धावुन आले व कोणाची ही वाट न बघता व क्षणाचाही विलंब न करता रस्त्याने जाणारा ऑटो चालक श्री. सुरज मानिक चव्हाण रा. वडाळी अमरावती यांना थांबवुन ऑटो मधील प्रवाशी यांना उतरवुन तेथील
लोकांचे मदतीने श्रीमती प्रियंका कोटावार यांना ऑटोमध्ये टाकुन ताबडतोब डॉक्टर लाहोटी यांचे दवाखान्यात नेवुन उपचारार्थ भरती केले, साईड इंजिनिअर श्री. विवेक मोहन काकड यांनी व ऑटो चालक श्री. सुरज माणिक चव्हाण रा. वडाळी अमरावती यांनी अपघाताचे वेळी पोलिस विभागातील सहायक पोलिस निरीक्षक श्रीमती प्रियंका कोटावार यांना अपघाताचे ठिकाणावरून उचलुन
नेवुन डॉक्टर लाहोटी यांचे दवाखान्यात वेळीच भरती केले, त्यांनी केलेल्या मदतीची विशेष नोंद म्हनुन पोलिस आयुक्त अमरावती शहर यांनी घेवुन आज दिनांक ०७.११. २०२३ रोजी साईड इंजिनिअर श्री. विवेक मोहन काकड यांनी व ऑटो चालक श्री.
सुरज माणिक चव्हाण रा. वडाळी अमरावती यांना प्रत्येकी १००००/- रूपये रोख रक्कम देवुन त्यांचा सत्कार केला. सत्काराचे वेळी पोलीस उपायुक्त परिमंडळ २ अमरावती विक्रम साळी, पोलिस उपायुक्त परिमंडळ १ अमरावती सागर पाटील, तसेच महिला पोलिस निरीक्षक श्रीमती सिमा दाताळकर पोलिस ठाणे राजापेठ
हजर होत्या.


