प्रेमी युगुलास लुटणार्यास स्थागुशा पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

प्रेमी युगुलास लुटून जबरी चोरी करणारे आंतरराज्यीय सराईत आरोपी स्थागुशा पथकाने केले गजाआड….

अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.१५/०१/२०२४ रोजी पोलिस स्टेशन शेदुरजनाघाट येथे फिर्यादी  प्रेम बागळे रा. पुसला यांनी तक्रार दिली की, ते आणि त्यांची मैत्रिण हे  पंढरी येथील तलावावर फिरायला गेले असता दोन अज्ञात इसमांनी फिर्यादी व मैत्रिण यांना धमकावुन धक्काबुक्की करुन फिर्यादी चे दोन मोबाईल व २० ग्रॅम सोन्याची चैन किं
अंदाजे ८७,०००/-रुचा माल जबरीने चोरुन नेला आहे.





अशा फिर्यादीचे तक्रारीवरुन  पो.स्टे.शेदुरजनाघाट येथे अप क्र १५/२०२४ कलम ३९२,३४ भादवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. घटनेचे गांर्भीय पाहता सदर गुन्हयातील आरोपींना  अटक करुन गुन्हा उघडकिस आणने कामी विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रामीण यांनी मार्गदर्शीत केले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समातंर तपास करीत असतांना दिनांक १९/०२/२०२४ रोजी माहीती मिळाली कि, पांढुर्णा मध्यप्रदेश सराईत गुन्हेगार  करणसिंग जगसिंग भादा,रा.कबाडी
मोहल्ला, पांढुर्णा, मध्यप्रदेश हा दखलपात्र गुन्हा करण्याच्या उददेशाने पो.स्टे.शिरखेड हददीत त्याच्या मोटार सायकलने फिरत आहे. प्राप्त माहीतीची शहानिशा करून स्था.गु.शा.पथकाने ग्राम नेर ते राजुरवाडी मार्गावर नाकाबंदी केली असता आरोपी करणसिंग जगसिंग भादा,रा.कबाडी मोहल्ला, पांढुर्णा, मध्यप्रदेश त्याचे
दुचाकीने येत असतांना त्यास थांबण्याचा इशारा केला परंतु तो न थांबता पोलिसांना पाहुन त्याची दुचाकी रस्त्यावर सोडुन नजीकचे जंगल परिसरात पळुन गेला असता पोलिसांनी त्याचा सिनेस्टाईल पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले व विचारपुस केली असता आरोपीने वरील गुन्हा त्याचा फरार साथीदार जोगीन्द्र ऊर्फ
लुल्ला रा.पांढुर्णा याचे सोबत मिळुन केला असल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे ताब्यातुन चोरीतील ०२ मोबाईल किं. एकुण अं.१७,०००/- रूचा जप्त करण्यात आला आहे. पुढील तपासकामी आरोपीस मुद्देमालासह शेदुरजनाघाट पोलिसांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास शे.घाट पोलिस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक स्थागुशा किरण वानखडे यांचे नेतृत्वात पो.उप.नि.नितीन
चुलपार, पोलिस शिपाई, गजेद्र ठाकरे, बळवंत दाभणे, रविद्र बावणे, भुषण पेठे, पंकज फाटे, चालक मंगेश मानमोठे, सागर धापट व सरीता चौधरी यांनी केली आहे.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!