
हातचलाखीने दुकानदाराची फसवणुक करणारी ईराणी टोळी स्थागुशा पथकाने केली जेरबंद…
हात चलाखीने दुकानदारांची फसवणुक करणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड,स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामिण ची कार्यवाही….
अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,
स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण चे पथकास गोपनिय खबर मिळाली कि, चिखलदरा परीसरात एक इराणी महिला व दोन पुरुष संशयितरित्या फिरत आहेत अशा गोपनिय खबरे वरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर टोळीवर सतत दोन दिवस लक्ष ठेवून माहीती घेतली असता समजले कि, सदर टोळीतील पुरुषांचे नाव व पत्ता


१) यावर अब्बास काझीम हुसेन वय ३६ वर्ष व

२) खादम हुसैन काझीम हुसेन सैयद वय ४३ वर्ष

तसेच महिलेचे नाव
३) कुबरा खादम सैयद वय ३३ वर्ष तिन्ही रा. इंदिरानगर आंबिवली जि.ठाणे
असे असुन ते हातचलाखीने गुन्हे करण्यात सराईत आहेत. तसेच पो
स्टे खालापुर जि. रायगड व पो स्टे खडकपाडा जि.ठाणे येथील गुन्हयात फरार असुन त्यांचा शोध सुरु आहे. दिनांक १९/०२/२०२४ रोजी स्थागुशा अमरावती ग्रा पथकाने रायगड व ठाणे पोलिस यांचे सोबत संपर्क करुन सदर आरोपीबाबत सविस्तर माहीती घेतली. पो.स्टे खडकपाडा जि.ठाणे व खालापुर जि.रायगड पोलिसांनी आरोपी हे त्यांचे गुन्हयात पाहीजे असल्याचे कळवुन ते अमरावती येथे हजर आले सदर दोन्ही पोलिस पथक परतवाडा शहरात पोहचुन
त्यांनी स्थागुशा अमरावती ग्रा पथकांना सदर आरोपी यांना ताब्यात घेणे कामी मदत मागितली असता स्थागुशा अमरावती पथकाने परतवाडा शहरातुन लक्ष ठेवून असलेल्या टोळीतील दोन पुरुष व एक महिला यांना ताब्यात घेतले. संशयित इसमांना त्यांनी केलेल्या गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्यांनी आधी उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांना अधिक विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्यातील दोन पुरुषांनी रायगड जिल्हयातील तसेच इतर भागात दुकानदारांना विशेष नंबरची नोट पाहीजे आहे नोट मिळुन आल्यास जास्त पैसे देवुन नोट घेतो असे आमिष देवुन दुकानदार
हे नोटवरील नंबर पाहत असता हातचलाखीने पैसे काढुन घेवुन त्यांची फसवणुक केल्याचे सांगितले. टोळीतील पुरुष पो स्टे खालापुर जि.रायगड अपराध क्र. ७१ / २४ कलम ४२०,३४ भादंवि मध्ये पाहीजे आरोपी महिला आरोपी कुबरा खादम सैयद हि पोलिस स्टेशन खडकपाडा जि.ठाणे अप क. ५०१/२०२३ कलम ३०७,३९९ भादंवि सह कलम ३(१)(!!), ३(२),३(४) महाराष्ट्र सघंटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ (मोक्का) मध्ये पाहीजे आरोपी आहे.
असुन त्यावरुन तिन्ही आरोपींना संबधीत पोलिस स्टेशनचे पथकाचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर तिन्ही आरोपी यांचेवर विविध भागात फसवणुकीचे तसेच इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार असल्याचे स्पष्ट झाले.
सदरची कारवाई .विशाल आनंद, पोलिस अधिक्षक अमरावती ग्रा., मा.पंकज कुमावत, अप्पर पोलिस अधिक्षक, यांचे मार्गदर्शनात .किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा.यांचे नेतृत्वात सहा पोलिस निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे, रविंद्र व-हाडे, स्वप्नील तंवर, सागर नाठे, शांताराम सोनोने महिला पोलिस वृषाली वाळसे, चालक निलेश येते यांनी केली.


