तिवसा व वरुड येथील ATM गॅस कटरचे साहाय्याने कट करणाऱ्या टोळीच्या आणखी एका सदस्यास हरीयाना येथुन घेतले ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

वरूड व  तिवसा येथील ATM गॅस कटरने कापुन त्यातील रक्कम  चोरणाऱ्या टोळीतील ०१ आरोपीस मेवात हरियानामधूण अमरावती ग्रामीण पोलिसांनी केले जेरबंद…

गॅस कटरने ATM फोडुन रोकड लंपास करणारे,स्थागुशा पथकाचे ताब्यात,एकास हरियाणा येथुन केली अटक…







अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दिनांक ०९/०२/२०२४ रोजी ०० / ०२ वा ते. ०६/०० वा. दरम्यान अमरावती जिल्ह्यातील पोलिस स्टेशन वरूड आणि पोलिस स्टेशन तिवसा हद्दीत काही अज्ञात आरोपींनी तिवसा येथील SBI च्या ०२ ATM मशीन गॅस कटरच्या मदतीने कापून तसेच वरूड येथील SBI च्या ATM मशीन मधूण १८,७५,८००/- रू. आणि येथील SBI ATM मशीन मधूण २०,७२,८०० /- रू. असे एकूण ३९,४८,६००/- रू. चोरून नेले होते. त्याबाबत पोलिस स्टेशन वरूड येथे फिर्यादी आशिष मधुकरराव चेचरे यांचे तक्रारीवरुन गुन्हा रजि. क्र. १३ / २०२४ कलम ४५७, ३८०, ३४ भा.द.वि. अन्वये तर पोलिस स्टेशन तिवसा येथे फिर्यादी अल्पेश रमेशराव तांबुसकर यांचे तक्रारीवरुन गुन्हा १२ / २०२४ कलम ४५७, ३८०, ३४ भा.द.वि. अन्वये गुन्हे नोंद करूण तपासा सुरु करण्यात आला होता.



सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊण अमरावती जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक  किरण वानखडे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या ०३ पथक तयार करुन सदर गुन्हयाचा विविध दिशेने तपास करण्यात आला तपासा दरम्यान सदर पथकाने घटना घडल्यापासूण सलग ११ दिवस १२०० किलोमीटरचा प्रवास करून सी.सी.टि.व्ही. आणि तांत्रिक बाबींच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला असता सदरचे गुन्हे मेवात, हरियाणा येथील आंतरराज्यीय ए. टी. एम. फोडणा-या टोळीने केले असल्याची माहीती प्राप्त झाली.
पोलिस पथक हे तात्काळ मेवात येथे पोहचुन आरोपी राहत असलेल्या परिसराची व आरोपींची संपुर्ण माहीती प्राप्त केली असता सदर परिसर हा अत्यंत संवेदनशिल स्वरुपाचा असल्याचे लक्षात आले तसेच सदर ठिकाणी यापूर्वी पोलिसांवर हल्ले झाले असल्याच्या घटना घडलेल्या आहेत अश्यावेळी पोलिस पथकाने अत्यंत कुशलतेने नमुद गुन्हयाचे कटात सहभागी असलेला आरोपी मो. तौफीक मो. कमरूदीन, वय ३२ वर्ष, रा. जमालगड, ता. पुन्हाना, जि. नुह (मेवात ) हरियाणा यास हरियाना येथूण दि.२०/०१/२०२४ रोजी ताब्यात घेऊन त्याचेकडूण गुन्हयात वापरलेले वाहन M-G- Hector क्र. एच.आर. ९३ ए ४२४८ किंमत १०,००,०००/- रू. ची जप्त करूण नमुद आरोपीचा न्यायालयाकडून ०८ दिवस पोलिस कस्टडी रिमांड मिळवूण त्याचेकडून चोरी गेलेल्या रक्कमेपैकी रोख
१,००,००० /- रू. रिकव्हरी करण्यात आली होती.

त्यानंतर सदर गुन्हयातील ईतर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याकरीता पोलिस अधिक्षक यांचे आदेशाने स्था. गु. शा. पो. स्टे. वरूड, आणि पो.स्टे. तिवसा येथील प्रत्येकी ०१ पथक तयार करूण नुह ( मेवात ) हरियाना येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथक नमुद ठिकाणी सतत ०८ दिवस थांबूण उर्वरित आरोपींबाबत माहीती गोळा करूण नमुद गुन्हयातील मुख्य आरोपी जमशेद एर्फ पिट्टल पिता ईलीयास यास पकडण्याचे प्रयत्न केले असता त्याने तेथील भौगोलीक परिस्थतीचा फायदा घेऊन पळ काढण्यात तो यशस्वी झाला. मात्र सदर टोळीतील आरोपी मुस्तकिन उर्फ फौजी पिता मुसा, वय २८ वर्षे, रा. ओथा तहसिल पुन्हाना जि. नुह (हरियाना) यास त्याचे राहते घरातून पकडण्यात अमरावती येथील पोलिसांच्या पथकास यश आले असून नमुद आरोपींना दि २१/०६/२०२४ रोजी ताब्यात घेऊन अमरावती येथे आणून दिनांक २२/०६/ २०२४ रोजी अटक करूण त्याचा दिनांक २७/०६/ २०२४ रोजी पर्यंत वरूड न्यायालयाकडूण पोलिस कस्टडी रिमांड प्राप्त झाला आहे त्याचेकडूण उर्वरीत मुद्देमालाची रिकव्हरी करण्यात येत आहे. तसेच गुन्हयातील अद्यापही फरार असलेले आरोपी १) जमशेद एर्फ पिट्टल पिता ईलीयास, रा. नावली तह. फिरोजपुर झिरीका, जि.नुह, २)जुनेद पिता हाजरखॉ, रा. पिनगवा, तह. पुन्हाना, जि. नुह, ३) शहादत पिता हाजरखॉ, रा. पिनगवा, तह. पुन्हाना, जि. नुह आणि ४) शाहीद पिता हसन, रा. जमालगढ, तह. पुन्हाना, जि. नुह यांचा लवकरात लवकर शोध घेऊन अटक करण्यात येणार आहे.

सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक  विशाल आनंद,अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरण वानखडे  यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक नितीन चुलपार, पोलिस स्टेशन वरूड येथील पोलिस उपनिरीक्षक नितीन ईंगोले, पोलिस स्टेशन तिवसा येथील पोलिस उपनिरीक्षक गणेश सपकाळ, पोहवा गजेंद्र ठाकरे,सचिन भगत,पोशि पंकज फाटे, प्रभु पाटिल,भुषन वानखडे, विजय चव्हान, सायबर पोलिस चेतन गुल्हाने, रितेश वानखडे यांनी केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!