
चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतुन ट्रॅक्टर व ट्रॅाली चोरणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…
चांदुर रेल्वे पोलिस स्टेशन हद्दीतील बासलापुर गावातुन ट्रॅक्टरसह ट्रॉली चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद…
अमरावती(प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक १९/१२/२०२३ रोजी फिर्यादी गजानन केशवराव बोबडे रा. बासलापुर ता. चांदुर रेल्वे यांनी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे तक्रार दिली की, दि. १७/१२/२०२३ रोजी चे रात्री ०१/३० वा. दरम्यान कोणीतरी अज्ञात ईसमाने त्यांचे घरासमोरून त्यांचे मालकीचा जॉनडियर कंपनीचा ट्रॅक्टर मुंडके क्रमांक एम एच २७ एल २६९८ क्रमांकाचा ट्रॉलीसह कि.अं. ५,००,०००/- रू चा चोरटयांनी चोरून नेला. अशा तकारीवरून पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथे अपराध क्रमांक ६४१ /२०२३ कलम ३७९ भादवी चा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक, विशाल आनंद यांनी सदर गुन्हा उघडकीस आणने करिता स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना आदेशीत केले होते. स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण येथील पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना गोपनिय बातमीदारामार्फत खबर मिळाली की, सदर गुन्हयातील चोरी गेलेला ट्रॅक्टर ट्रॉलीसह ग्राम डोणगाव ता. मेहकर जि. बुलढाणा येथील राहणारा एक ईसम याने त्याचे साथीदारासह चोरी केला असल्याचे समजले वरून स्था. गु. शा. चे पथकाने तेथे जावुन गजानन लक्ष्मण मुळे रा. डोणगाव बुलढाणा यास ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे साथीदार


१) किशोर रामभाउ सदावर्ते वय ३९ वर्ष, रा. आरेगाव ता. मेहकर जि. बुलढाणा
२) अरुण बाबुराव पोहार वय ३५ वर्ष, रा. रामनगर, हनुमान मंदीर जवळ,
३) सचिन बजरंग ढोंगळे वय ३२ वर्ष, रा. झाकली ता. पन्नाळा जि. कोल्हापुर
४) मल्हार उर्फ जे.सी.बी. गंगाराम वाणी वय ३७ वर्ष, रा. हाता ता. सेनगाव जि. हिंगोली यांचे मदतीने चोरी केल्याचे सांगितले व ती कशा पध्दतीने केली तेही सांगितले यातील आरोपी

१) किशोर सदावर्ते रा. आरेगाव ता. मेहकर जि बुलढाणा हा व

२) सचिन ढोंगळे रा. झाकली ता. पन्नाळा जि.कोल्हापुर व इतर ०३ फरार आरोपी यांचेसह मिळून किशोर सदावर्ते यांच्या चारचाकी स्विफ्ट गाडीने ग्राम बासलापुर,चांदुर रेल्वे येथे जावून चोरी करून मल्हार उर्फ जे.सी.बी. गंगाराम वाणी रा. हाता ता. सेनगाव जि. हिंगोली याचे माध्यमातुन अरूण बाबुराव पोहार रा. रामनगर, हनुमान मंदीर जवळ, जालना याला ४०,००० / रू ला विक्री केल्याचे सांगीतले. वरून मल्हार उर्फ जे.सी.बी. वाणी व अरूण पोहार रा. जालना यांना ताब्यात घेवून त्याचे कडून गुन्हयात चोरी गेलेला जॉनडियर कंपनीचे ट्रॅक्टर मुंडके कि.अं. ३,००,००० /- रू. ट्रॅक्टर ट्रॉली कि.अं. २,००,००० /- एक स्विफ्ट चारचाकी गाडी कि.अं. ५,००,००० /- रू, असा एकुण ८,००,००० /- रू चा मुदेमाल जप्त करण्यात आला असुन वरील नमुद ०४ आरोपीतांना अटक करण्यात आली आहे तसेच इतर फरार आरोपीतांचा शोध घेण्यात येत आहे. तरी नमुद आरोपी व गुन्हयातील मुदेमाल गुन्हयाचे पुढील तपासकामी पो.स्टे. चांदुर रेल्वे यांचे ताब्यात देण्यात आले असुन तपासात नमुद आरोपीतांकडून अधिक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी यांचे मार्गदर्शनाखाली किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांचे नेतृत्वात पो.उप.नि. मोहम्मद तस्लीम शेख गफुर श्रेणी पोउपनि मुलचंद चंद्रभानजी भांबुरकर, पो.हे. कॉ. पुरुषोत्तम यादव,मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, ना.पो.कॉ. सचिन मसांगे, चालक पो. कॉ. मंगेश मानमोठे यांचे पथक व पो.स्टे. सायबर यांनी केली.


