अट्टल दुचाकी चोरट्यास चाकुसह ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दहशत पसरविणा-या अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेऊन उघड केले ४ दुचाकी चोरीचे गुन्हे…

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि(१४) ॲागस्ट २०२४ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक वाढत्या मोटार सायकल चोरी अनुषंगाने रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करणेकरीता पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे हद्दीत पेट्रोलींग करीत असतांना पथकास गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, पोहरा बंदी येथे राहणारा प्रमोद चव्हाण नावाचा इसम हा एका काळया रंगाचे विनाकमांकाचे बुलेटवर बसुन ग्राम चिरोडी येथील बसस्टॉप वर आरडाओरड करुन दहशतीचे वातावरण तयार करीत आहे आणि त्याचे कमरेला चाकु लावलेला आहे,





अशा खात्रीलायक बातमीवरुन स्थागुशा पथकाने मिळालेल्या माहितीनुसार ग्राम चिरोडी येथे पोहचुन प्रमोद परसराम चव्हाण, वय १९ वर्ष, रा. ग्राम पोहरा बंदी, ता.जि. अमरावती यास धारदार चाकु व बुलेट वाहनासह ताब्यात घेतले. नमुद इसम गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने धारदार चाकु ताब्यात बाळगुन मिळुन आल्याने त्याचेविरुद्ध पो स्टे चांदुर रेल्वे येथे कलम ४, २५ आर्म अॅक्ट प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.



दरम्यान त्याचे ताब्यात असलेल्या बुलेट वाहनासंदर्भात कसुन विचारपुस केली असता, त्याने नमुद वाहन हे अमरावती शहरातुन चोरल्याचे सांगितले वरुन अभिलेख पडताळणी केली असता, १) पो स्टे फेजरपुरा येथे अप क. ४८९/२४ कलम ३७९ भादंवि चा गुन्हा नोंद असल्याचे निष्पन्न झाल्याने सदर वाहन ताब्यातघेऊन जप्त करण्यात आले. प्रमोद चव्हाण यास विश्वासात घेवुन अधिक सखोल विचारपुस केली असता, त्याने २) पो स्टे फ्रेजरपुरा येथे अप क. ६७९/२४ कलम ३०३(२) भान्यासं, ३) पो स्टे फ्रेजरपुरा येथे अप क. ४७४/२३ कलम ३७९ भादंवि आणि ४) पो स्टे फेजरपुरा येथे अप क. ६३७/२४ कलम ३०३(२) भान्यासं याप्रमाणे एकुण ०४ मोटार सायकल चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याने संबंधितांकडुन ०४ मोटार सायकल, किंमत ३,५५,०००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.



सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर, पोलिस अंमलदार अमोल देशमुख, मंगेश लकडे, चंद्रशेखर खंडारे, सचिन मसांगे, शाम मते यांचे पथकाने पार पाडली.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!