अनेक जिल्ह्यात घरफोडी करणारी जालना येथील टोळी अमरावती ग्रामीण गुन्हे शाखेने केली जेरबंद,अनेक गुन्ह्याची केली उकल….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दर्यापूर शहरातील एकाच रात्री दुकाने फोडनारे अट्टल आरोपी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण कडून जेरबंद,जिल्हा व बाहेरील जिल्ह्यातील अनेक गुन्हे केले उघड….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सविस्तर व्रुत्त असे की,दि.(२१)जुलै २०२४ रोजी यातील फिर्यादी संतोष बबनराव शिंदे, वय ४४ वर्ष रा. दर्यापूर यांनी पोलिस स्टेशन दर्यापूर येथे तक्रार दिली की दि. २१/०७/२०२४  चे रात्री दरम्यान अज्ञात आरोपींनी त्यांचे देशी दारू दुकानाचा कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करून गल्यातील नगदी ६०,०००/- रू व डि.व्ही.आर किं अं ४०००/- रू असा एकुन ६४,०००/- रु चा मुददेमाल चोरून नेला आहे यावरून पोलिस स्टेशन दर्यापूर येथे अप क्रमांक ४१७ / २०२४ कलम ३०५,३३१ (२) (५) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता. तसेच त्याच रात्री गजानन टोळे यांचे टोळे जिनींग मधून सुध्दा अज्ञात आरोपींनी ६८,०००/– रू व एक डि.व्ही.आर किं अं १०,००० /रू असा एकून ७८,०००/- रू चा मुददेमाल चोरून नेला यावरून सुध्दा पोलिस स्टेशन दर्यापूर येथे अप क्रमांक ४१९ / २०२४ कलम ३०५,३३१ (२) (५) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद आहे. त्याचप्रमाणे दर्यापूर येथील वैभव मधुकर माळोकार यांचे ज्वेलर्स दुकानाचे कुलूप कोंडा तोडून १०० ग्रॅम चांदिच्या मुर्ती व १०० ग्रॅम चांदीचे पैजन असा एकुण १८,५००/- रु चा मुद्देमाल चोरून नेला होता यातसुध्दा पोलिस स्टेशन दर्यापूर येथे अप क्रमांक ४१६ / २०२४ कलम ३०५,३३१ (२) (५) बि.एन.एस प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता





सततच्या होणार्या घरफोडीचे गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता तसेच अमरावती (ग्रा) जिल्हयात होणार्या मोठया प्रमाणात रात्रीदरम्याण होना-या दुकान घरफोडीला आळा बसावा याकरीता पोलिस अधिक्षक, अमरावती (ग्रा) यांनी सदरचे गुन्हे उपडकीस यावे या करीता पोलिस स्टेशन दर्यापूर, तसेच स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीण यांना सुचना निर्गमीत केल्या होत्या त्याप्रमाणे
सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असतांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अमरावती, अकोला, यवतमाळ जिल्हयातील
विविध ठिकानच्या सी. सी.टि.व्ही फुटेजचे विश्लेषन करून तांत्रीक पुरावे गोळा करून आणि आरोपीची गुन्हा करण्याच्या पध्दती वरून
विचारपूस करणे सुरू केले असता गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, सदर गुन्हेगार हे जालना परीसरातील असू शकतात.



त्यावरून जालना येथे जावून प्राप्त गोपनीय माहिती वरून गजानन सोपानराव शिंगाडे रा. पाचवडगाव ता. जि. जालना यास जालना
ताब्यात घेवुन गुन्हयाबाबत विचारपुस केली असता त्याने प्रथम स्था.गु.शा चे पथकास उडवाउडवीची उत्तरे दिली. परंतू नंतर त्याला
विश्वासात घेवून अधिक विचारपूस केली असता त्याने दर्यापूर येथे घडलेल्या वरील तिन्ही गुन्हयाची कबूली दिली व त्याने त्याचे साथीदार राहुल तूलजासिंग राजपूत रा. जालना अधिक त्याच्या ३ साथीदारांसह मिळून चारचाकी वाहनाने जालना येथून यवतमाळ जिल्हयात करंजी येथे येवून तेथे एक चार चाकी बोलेरो पिकअप वाहन चोरी करून मारेगाव येथील दोन दुकानात चोरी केली. त्या नंतर अमरावती जिल्हयात येवून एका गावातील टाटा सुमो चारचाकी वाहन घेवून गेले व यवतमाळ जिल्हयातून चोरलेली बोलेरो पिकअप गाडी थोड्या अंतरावर टाकुन तेथून टाटासुमो गाडीने दर्यापूर येथे जावून तेथील एक देशी दारू दुकान, एक ज्वेलर्स दुकान व एका जिनींग मध्ये चोरी केली तसेच देशी दारू दुकानातील व जिनींग मधील नगदी पैसे व डि.व्ही.आर बॉक्स चोरून नेले. त्यांनतर त्यांनी अकोला जिल्हयातील आकोट शहरातील गावाबाहेर असलेल्या गॅस गोडावून मध्ये चोरी केली तसेच तेथील डि.व्ही.आर बॉक्स चोरून नेला. सोबत असलेली टाटा सुमो गाडी तेथे सोडून तेथून एक लाल रंगाची टवेरा गाडी चोरून जालना येथे परत गेले असे सांगून गुन्हयाबाबत कबुली दिली. त्याचा साथीदार राहुल तुलासींग राजपूत वय २२ वर्ष, रा. मुगल बाजार, लोधी मोहला, जालना याला शिवाजी चौक, जालना येथून ताब्यात घेण्यात आले.



आरोपींच्या ताब्यातून गुन्हयात दुकाने फोडण्यासठी वापरलेली एक लोखंडी टॉमी व एक राउंड पाना किं अं १५० /- रू व गुन्हयातील
नगदी ९,२५०/- असा एकुन ९,४०० रू चा मुददेमाल जप्त करून दोन्ही आरोपींना दिनांक २४/०७/२०२४ रोजी पुढील कार्यवाही
करीता पोलिस स्टेशन दर्यापूर यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदर आरोपींकडून पोलिस अभीलेखावरील १) पो.स्टे.दर्यापूर अप क्रमांक ४१७/२०२४ २) ४१९/ २०२४३) ४१६ / २०२४ कलम ३०५, ३३१ (२) (५) बि.एन.एस व ४) पो. स्टे. खोलापूर अप क्रमांक
१२४/२४ कलम ३०३(२) बि.एन.एस प्रमाणे एकुन ४ गुन्हे तसेच यवतमाळ जिल्हयातील पो.स्टे मारेगाव येथील १ गुन्हा, पो.स्टे वणी
येथील गुन्हा, पो.स्टे पांढरकवडा येथील १ गुन्हा, व अकोला जिल्हयातील पो.स्टे आकोट शहर येथील २ गुन्हे असे एकुन ९ गुन्हयांची कबूली दिली आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक  विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक किरण वानखडे, स्थानिक गुन्हे शाखा, अमरावती (ग्रामीण) यांचे नेतृत्वात पो.उप.नि नितीन इंगोले, पोलीस अंमलदार त्रंबक मनोहर, सुनिल महात्मे, सुधिर बावने, सैयद अजमत, निलेश डांगोरे, पंकज फाटे, दिनेश कनोजीया, श्याम मते, रितेश वानखडे, चेतन गुल्हाने यांनी केली केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!