
अंमली पदार्थ गांजासह नाशिक येथील ईसमास चांदुर रेल्वे पोलिसांनी घेतले ताब्यात….
अंमली पदार्थ गांजासह एकास पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे यांनी घेतले ताब्यात….
चांदुर रेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रकारचे अवैध धंदे बंद करण्याचे आदेश सर्व प्रभारींना देण्यात आले होते त्याअनुषंगाने दि २७ मार्च २०२५ रोजी पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे येथील पथक हद्दीत पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळली की, एक इसम गांजा अंमली पदार्थाची वाहतुक पोलिस स्टेशन हद्दीतुन करणार आहे


अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार चांदर रेल्वे ते तळेगाव दशासर यामार्गावर नाकाबंदी केली परंतु सदर ईसम हा कोणत्या साधनाने येत आहे हे निश्चीत नसून तो शहराचे बाहेरच थांबणार आहे अशी खात्रोशिर माहीती मिळाली यावरुन उपविभागीय पोलिस अधिकारी, चांदुर रेल्वे यांचे परवानगीने तळेगाव रोडने संशयीत इसमाचा शोध घेत असतांना ग्राम राजना फाटा थेथील प्रवासी निवारा येथे मिळुन आला त्याची तपासनी केली असता त्याचेजवळ पांढ-या रंगाचे थैलीमध्ये १.८९० किलोग्रंम कि ३८,८००/- रू ,एक विवो मोबाईल कि ८०००/- रू असा एकुण ४६,८००/- रू चा मु्द्देमाल मिळुन आला.

सदर ईसमास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव मकेश चंद्रकांत सोनवणे रा.डॉं. बाबासाहैब आंबेडकर वाडी, सिध्दार्थ हॉटेल समोर पना रोड नाशिक असे सांगीतले यावरुन त्यास ताब्यात घेण्यात आले. जप्ती पंचनामा करण्यात आला व पोलिस स्टेशन चांदर रेल्वे येथे अपराध क १०६/२५ कलम ८(क), २०(ब), (ii) एन.डी.पी.एस. अॅक्ट प्रमाणे गन्हा नोंदविण्यात आला आहे.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशांल आनंद, अपर पोलिस
अधिक्षक पंकज कुमावत, उपविभागीय पोलिस अधिकारी चांदुर रेल्वे अनिल पवार यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक, अजय आकरे, पोउपनि सयोग महापरे, पोउपनि नैतेश आझंडे, परि. पोउपनि रोहित कुदळे,पोहवा ‘शिवाजी धूर,प्रविण , नापोशि प्रांत ढोक, व चालक पोहवा मुझफर शेख, यांनी केली आहे


