चांदुररेल्वे पोलिसांनी नाकाबंदी करुन पकडली १५ किलो गांजाची खेप…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

नाकाबंदी करुन चांदुररेल्वे पोलिसांची अवैधरित्या गांजाची वाहतुक करणार्यावर कार्यवाही,चारचाकी वाहनासह १५ किलो गांजासह ३ आरोपींना घेतले ताब्यात….

चांदुररेल्वे(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,दि ११ फेब्रुवारी रोजी पोलिस स्टेशन चांदुररेल्वे चे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना पोलिस निरीक्षक अजय आकरे यांना गोपनीय माहीती मिळाली की पळसगाव येथे राहणारा हिंमाशु शेन्डे नावाचा ईसम अंमली पदार्थ गांजाची अवैधरित्या वाहतुक करणार आहे अशा मिळालेल्या गोपनीय माहीतीवरुन उपविभागिय पोलिस अधिकारी .चांदुर रेल्वे याचे परवानगी ने मालखेड रेल्वे-बडनेरा रोडवर स्टाफ सह नाकाबंदी केली असता वाहन क्र.MH 02- CD 2591 येताना दिसली सदर वाहनास चेक केले असता वाहनात एकूण 3 व्यक्ती मिळुन आले त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव अनुक्रमे 1) हिमांशु नारायण शेन्डे रा.पळसखेड 2) मोहन मनदेव चव्हाण रा.मांजरी मसला 3) प्रविण चंदु चव्हाण रा.लालखेड असे सांगीतले





यावरुन सदर वाहनाच्या झडती मध्ये १५ kg गांजा(अंदाजे किंमत 3 लक्ष रू) मिळूम आला.करीता सदर ठिकाणी नियमानुसार जप्ती पंचनामा करण्यात आला व यावरुन पोलिस स्टेशन चांदुररेल्वे येथे अप क्र 34 /2025 कलम 20(B) NDPS act प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आंनद,अप्पर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत,उपविभागिय पोलिस अधिकारी,चांदुर .अनिल पवार याचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस स्टेशन चांदुर रेल्वे पोलिस निरीक्षक अजय आकरे,पोउपनि आझडे, परी पोउपनि विशाल कुदळे,पोहवा शिवाजी घुगे,प्रवीण मेश्राम, गजानन वाघमारे , PC भुताडे, पाचपोर चालक पोहवा मुझफर शेख सायबर पोलिस स्टेशनचे  सागर धापड यांनी केली







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!