शेतमाल चोरणारी टोळी शिरजगाव पोलिसांनी केली जेरबंद,४ आरोपी ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

शेतक-यांच्या शेतमालाची चोरी करणारी टोळी शिरजगांव पोलिसांनी केली जेरबंद,गुन्ह्यांत वापरलेल्या वाहनासह १९ लाखाचा मुद्देमाल केला जप्त….

शिरजगाव(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,अमरावती  जिल्ह्यातील पोलिस स्टेशन शिरजगांव (क) येथे दि.१३/०९/२०२४ रोजी सागर विश्वास शेळके, रा. सालेपुर यांनी तक्रार दिली की, त्याचे शेतातुन अज्ञात आरोपींनी  ४० ते ५० कॅरेट संत्रा किं. २०,०००/- तोडुन चोरून नेला अशा तक्रारीवरुन पो.स्टे. शिरजगांव येथे अज्ञात आरोपी विरूध्द कलम ३०२ (२), ३ (५) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.





शेतकर्यांचा शेतमाल व शेती अवजारे चोरी यासारख्या गुन्हयांची तात्काळ दखल घेवुन सदर गुन्हयातील आरोपींना अटक करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलिस अधिक्षक विशाल आंनद,  यांनी आदेशित केले होते.त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा तपास पोलिस स्टेशन  शिरजगांव येथील पथक करीत असतांना गुप्त बातमीदारा कडुन माहीती प्राप्त झाली की, सदरचा गुन्हा हा १) गजानन ऊर्फ गुड्डु सुदाम बेठकर, वय २४,२) अनिल सुकराम भलावी, वय २३, ३) आनंद ऊर्फ बंटी रमेश मेटकर, वय २४,४) गेदलाल कामु उईके, वय २४ सर्व रा. खरपी यांना निष्पन्न करुन प्राप्त माहीतीची शहानिशा करून नमुद ईसमांना ताब्यात घेवुन विचारपुस केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली असुन याव्यतीरीक्त पोलिस स्टेशन. शिरजगांव हद्दीत आणखी ०२ शेतमाल चोरीचे गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे.



वर नमुद आरोपी हे दिवसाचे वेळी मोटारसायकलने शेताची पाहणी करून रात्री त्यांचेकडील बोलेरो पिकअप चारचाकी वाहनाने शेतातील माल चोरून बाजार समितीत विक्री करित असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयात वापरण्यात येणारी दुचाकी १, बोलेरो पिकअप चारचाकी २, प्लॉस्टीक कॅरेट ४० असा एकुण १९,३४,०००/- रूचा माल जप्त करण्यात आलेला आहे. पुढील तपास शिरजगांव पोलिस करित आहेत.



सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक विशाल आनंद, अपर पोलिस अधिक्षक.पंकज कुमावत, सहा पोलिस अधिक्षक तथा उपविभागिय पोलिस अधिकारी,अचलपुर शुभम कुमार  यांचे मार्गदर्शनात ठाणेदार पोलिस स्टेशन शिरजगाव सपोनि.महेन्द्र गवई, पोउपनि शिंदे, पो.हवा नानकराम जावरकर, मनोज पंडीत, अमोल कपले, दिपक डाहे, विनित क्षिरसागर, वैभव मांडवगणे, दिपक गवई, मोहीत चौधरी, अमोल नंदरधने, अर्जुन परीहार, अजय कुमरे, मपोशि राधीका उघडे, रूपाली नांदुरकर यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!