स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कडक कार्यवाही….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

स्फोटक परवान्याचे उल्लंघन करणा-या तीन इसमांवर स्फोटक अधिनियमान्वये स्थानिक गुन्हे शाखेकडुन कारवाई.

अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दिनांक २१/०३/२०२४ रोजी आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलींग करीत असतांना स्फोटक वाहतुकीचे बाबतीत प्राप्त गुप्त बातमीवरुन पोलिस स्टेशन कु-हा हद्दीत कु-हा ते तिवसा – कौंडण्यपुर वाय पॉईंटजवळ छापा कारवाई केली असता, ०३ इसम हे चारचाकी व दुचाकी वाहनासह पो स्टाफचे मदतीने ताब्यात घेण्यात आले.





त्यापैकी गजानन मारोतराव डंबारे, वय ४४, रा. आमला, ता. चांदुर रेल्वे, जि.अमरावती हा इसम त्याचे चारचाकी वाहनामध्ये एक खाकी रंगाचा खरड्याचे  बॉक्समधे १४६ नग स्फोटक कांडया व ९९ नग डिटोनेटींग केबल सह मिळुन आला तसेच त्याचे सोबत असलेले दोन इसम नामे शुभम श्रीकृष्ण सुलताने, वय २२ वर्ष व अविनाश राजेंद्र सुलताने, वय ३० वर्ष, दोन्ही रा. गोठा, ता. तिवसा, जि. अमरावती हे त्यांचे दुचाकी वाहनावर एक खाकी रंगाचा पृष्ठाचा बॉक्स ज्यामध्ये ११९ नग स्फोटक कांडया व ८० नग डिटोनेटींग
केबलसह परवान्याचे उल्लंघन करुन ताब्यात बाळगुन मिळुन आले. वरुन त्यांचेजवळील स्फोटक कांडया २६५ नग आणि डिटोनेटींग केबल १७९ नग, किं.अं. ४,४००/- रु आणि वाहतुकीसाठी वापरलेले चारचाकी वाहन एमएच ४६ एक्स ४६७८, पांढ-या रंगाची हयुंदाई आयटेन, किं. अं. ३,५०,०००/- रु आणि दुचाकी वाहन एमएच २७ सीएफ २२९६, काळया रंगाची निळा पट्टा असलेली हिरो कंपनीची एचएफ डिलक्स, किं ५०,०००/- रु
असा एकुण ४,०४,४००/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गजानन मारोतराव डंबारे, वय ४४, रा. आमला, ता. चांदुर रेल्वे, जि. अमरावती आणि शुभम श्रीकृष्ण सुलताने, वय २२ वर्ष व अविनाश राजेंद्र सुलताने, वय ३० वर्ष, दोन्ही रा. गोठा, ता. तिवसा, जि. अमरावती हे स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता ब्लास्टींग साठी वापरण्यात येणारी स्फोटके खाजगी वाहनामध्ये बाळगुन वाहतुक
करतांना तसेच स्फोटकांबाबत कागदपत्रे व शॉर्ट फायरबाबत चा परवाना सोबत न बाळगता परवान्यातील अटी व शर्तीचे उल्लंघन करून स्फोटकांबाबत कोणतीही सुरक्षा उपाययोजना न करता हाताळतांना व वाहतुक करतांना मिळुन आल्याने कलम ९ब, १२ भारतीय स्फोटक अधिनियम १८८४ सहकलम २८६, ३३६, १८८ भारतीय दंड विधान प्रमाणे त्यांचे विरुध्द पोलिस स्टेशन कु-हा येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अमरावती जिल्हयात आगामी लोकसभा निवडणुक अनुषंगाने अवैध व्यवसाय करणारे, अवैध शस्त्र वसस्फोटके बाळगणारे, गुंड प्रवृत्तीचे इसमांवर कारवाईची धडक मोहीम राबविण्यात येत आहे.



सदरची कार्यवाही  पोलिस अधिक्षक विशाल आनंद (भा.पो.से.), अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत (भा.पो.से.) यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा प्रमुख पोलिस निरीक्षक किरण वानखडे यांचे नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार, श्रेणी पोउपनि मुलचंद भांबुरकर,पोहवा अमोल देशमुख, मंगेश लकडे,चंद्रशेखर खंडारे, नापोशि सचिन मसांगे, चालक पोहवा संजय प्रधान यांचे पथकाने पार पाडली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!