
अवैधरित्या गुटख्याची वाहतुक करणारा कंटेनर परतवाडा पोलिसांनी ताब्यात घेऊन,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….
पार्सल कंटेनर मधुन होणाऱ्या प्रतिबंधीत गुटख्याचे वाहतुकीचा परतवाडा पोलीसांनी केला पर्दाफाश,१ कोटीच्यावर मुद्देमाल केला जप्त….
परतवाडा(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – लोकसभा निवडनुकीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचीत प्रकार घडु नये यासाठी पोलिस अधिक्षक विशाल आनंद यांनी सर्व प्रभारींना सतर्क राहण्यासाठी तसेच निरंतर पेट्रोंलिग करण्याचे आदेश देण्यात आले आहे


त्याअनुषंगाने दिनांक 05/04/2024 रोजी परतवाडा पोलिसांचे पथक परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गोपनीय माहिती मिळाली की, कंटनेर क्रमांक RJ 52 GA 3742 मध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये प्रतिबंधीत गुटखा परतवाडा कडे घेवून येत आहे. अशा मिळालेल्या गुप्त खबरेवरुन परतवाडा पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभाग अमरावती व सरकारी पंच यांना माहिती देवून अन्न प्रशासन अधिकारी, पंच व पो.स्टाफ सह मुस्लीम कब्रस्तान बैतुल रोड परतवाडा येथे नाकाबंदी केली. नाकाबंदी दरम्यान मध्यप्रदेश बैतुल कडुन येणारा कंटनेर क्रमांक RJ 52 GA 3742 ची पंचा समक्ष तपासणी केली असता सदर कंटेनरमध्ये मानवी आरोग्यास अपायकारक असलेला व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत पानमसाला व सुंगधीत तंबाखु चे 100 पोते मिळुन आले. ज्यामध्ये वाह कंपनीचा पान मसाला व सुंगधीत तंबाखु 75 पोते किमंत 49,68,750/- रुपये व बहार हेरीटेज पान मसाला व हेरीटेज सुंगधीत तंबाखु 25 पोते किमंत 17,50,000/- रुपये तसेच पान मसाला गुटखा वाहतुकीस वापरलेले कंटेनर किमंत अंदाजे 50,00,000/- रुपये असा एकुण 1 कोटी 17 लाख 750 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन आरोपी 1) आजाद खान हारुन खान वय 20 वर्ष रा. चोडपुर ता. भिलावाडी जि. अलवर राजस्थान यास ताब्यात घेण्यात आले असुन पोलिस सुत्राच्या माहीतीनुसार सदरचा गुटखा हा अकोला येथील शेख ईसराल शेख हबीब याचा असुन तपास पथक त्याला अटक करण्यासाठी अकोला येथे रवाना झालेली असुन याची माहीती त्याला मिळतात तो तेथुन पसार झाल्याचे कळते

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक, पंकज कुमावत, प्रभारी उपविभागीय अधिकारी अचलपुर अतुलकुमार नवगीरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पोलिस निरीक्षक प्रदिप शिरस्कर, पोउपनि. विठ्ठल वाणी, पोहवा. सचिन होले, पोहवा. सुधिर राऊत, पोहवा. उमेश सावरकर, नापोशि मनिष काटोलकर, पोशि विवेक ठाकरे. जितेश बाबील, घनशाम किरोले यांनी केली.



