वरुड हद्दीतील पेट्रोल पंपावरील दरोडा प्रकरणाचा काही तासाचे आत केला उलगडा,पंपावरील कर्मचारीच निघाला सुत्रधार…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

वरुड हद्दीतील ग्राम कुरळी येथील पेट्रोलपंप दरोडा प्रकरणातील आरोपीस अमरावती ग्रामीण पोलिसांनी शिताफिने तात्काळ केले जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा व पोलिस स्टेशन वरूड यांची  संयुक्तिक कामगिरी…..

वरुड(अमरावती)प्रतिनिधी – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, अमरावती जिल्हयातील पो.स्टे. वरूड हद्दीतील ग्राम कुरळी येथील वरूड-कुरळी मार्गावरील रामेश्वर नागदीवे, रा. वरूड यांचे मालकीचे इंडीयन आईल चे पेट्रोलपंपवर दि.१७/०९/२०२४ चे मध्यरात्री अज्ञात ५-६ अज्ञात ईसमांनी पेट्रोलपंपवर कैबिन मध्ये खिडकीच्या मार्गे प्रवेश करून आतमध्ये झोपलेल्या पेट्रोलपंपावर काम करणाऱ्या ०३ लोकांना मारहाण करून त्यांचे हातपाय बांधुन तेथील लोखंडी कपाट तोडुन त्यातील नगदी ५,३२,३७९/- रू.चा दरोडा टाकला होता. घटनेचेवेळी स्वतः हजर असलेले व पेट्रोपपंपवर काम करणारे शंकर संपतराव दंडाळे, रा. मेंढी, ता. वरूड, जि. अमरावती यांनी दिलेल्या तक्रारी वरून पो.स्टे. वरूड येथे दरोडयाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.





घटनेचे गांभिर्य लक्षात घेता पोलिस अधिक्षक विशाल आंनद,यांनी पो.स्टे. वरूड व स्थानिक गुन्हे शाखा येथील अधिकारी व अंमलदार यांना सदर गुन्हयातील आरोपींचा त्वरीत शोध घेवुन गुन्हा उघडकीस आणण्याबाबत निर्देशित केले होते. गुन्हा उघडकीस आणनेकामी पो.स्टे. वरूड व स्था.गु.शा. येथील पोलिस अधिकारी व अंमलदार यांचे ०४ संयुक्त पथके तयार करून घटनेबाबत सविस्तर माहीती संकलीत करणे सुरू केले तसेच उपलब्ध तांत्रीक पुराव्याचे आधारे पेट्रोपंपवर काम करणारे व घटनेचेवेळी प्रत्यक्ष हजर असलेल्या इसमांना विचारपुस केली असता पेट्रोपंपवर काम करणारा  प्रशिक सुभाष दंडाळे, वय २६, रा. कुरळी यांचे कथनात वेळो-वेळी विसंगती आढळुन येत असल्याने त्यास विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने त्याचा सहभाग सदर गुन्हयात असल्याची कबुली दिली.



सदर पेट्रोलपंप वरील पेट्रोल/डिझेल विक्रीची रक्कम दररोज बँकेत जमा करण्यात येत असते. पंरतु दि.१४/९/२०२४ ते १६/०९/२०२४ असे सलग ०३ दिवस बँकेला सुट्टी असल्याने तिन दिवसांची रक्कम ही पेट्रोलपंपवरील कपाटातच असल्याची बाब पंपावर काम करणारा प्रशिक दंदाळे याने हेरली होती वरून त्याने त्याचे इतर ०४ साथीदार यांचे संगणमताने कट रचून तसेच पेट्रोलपंपवर येण्याचा, आत शिरण्याचा मार्ग तसेच पेट्रोलपंपावरचा विद्युत प्रवाह बंद करण्याचे बटन, पंपवरील सि.सि.टी.व्ही. कॅमेरा ई. इत्यंभुत माहीती त्याने त्याचे साथीदारांना दिली. त्यांनी मध्यरात्री दरम्यान जेव्हा प्रशिक हा पंपावर काम करणारे इतर व्यक्ती बरोबर झोपला असतांना दरोडा टाकण्याची योजना आखली होती व त्याप्रमाणे इतर ०४ आरोपी  १) मयुर राजकुमार ठाकरे, वय २१,२) सुरज ऊर्फ सुधिर प्रभाकर घोरपडे, वय २०,३) डिग्या ऊर्फ दिगंबर श्यामराव राऊत, वय २२ सर्व रा. रा. सुरळी, ता. वरूड व ०१ फरार साथीदार यांनी पेट्रोलपंपचे कॅबिनचे खिडकीतून आत प्रवेश केला व फिर्यादी तसेच सोबतचे इसमांचे हातपाय बांधुन सदर दरोडयाचा गुन्हा करून नगदी रक्कम चोरून नेल्याचे निष्पन्न झाले आहे.



वर नमुद आरोपीना अटक करून  सुरज ऊर्फ सुधिर प्रभाकर घोरपडे याचे ताब्यातुन चोरी गेलेल्या रक्कमेपैकी ८२,०००/- रू. जप्त करण्यात आले आहेत. गुन्हयातील अन्य ०१ फरार आरोपी अटक व गुन्हयात चोरी गेलेली रक्कम हस्तगत करण्याची कारवाई करण्यात येत असुन पुढील तपास वरूड पोलिस करित आहेत.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक विशाल आनंद,अपर पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक .किरण वानखडे वरुड पोलिस स्टेशनचे ठाणेदार अवतारसिंग चव्हाण, पो.उप.नि नितीन चुलपार, नितीन इंगोले,दिपक दळवी पोलिस अंमलदार राजु मडावी, बळवंत दाभणे, गजेन्द्र ठाकरे, सुनिल महात्मे, रविन्द्र बावणे, भुषण पेठे, सचिन मिश्रा, सुधिर बावणे, शकील चव्हाण, निलेश डांगोरे, सै. अजमत, पंकज फाटे, अक्षय शेळके, प्रशांत राजस, मनोज टप्पे, सचिन भगत, किरण दहीवडे यांचे पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!