धरफोडी करणारा काही तासाच्या आत धारणी पोलिसांचे तावडीत…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

दुकानाचे शटर तोडुन चोरी करणारे चोरटे धारणी पोलीसांच्या ताब्यात…

धारणी(अमरावती ग्रामीण)प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की, दि.०२/०१/२०२३ चे रात्री दरम्यान अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी सुरेन्द्र ब्रिजलाल मांजरेवार, वय ३८ वर्षे, रा.धारणी यांचे धारणी येथील ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील ०२ ॲम्पलीफायर किं.७५,००००/- रू चे तसेच आशीष सुभाष जैस्वाल यांचे ईलेक्ट्रीकल्स चे दुकानाचे शटरचे कुलुप तोडुन आत प्रवेश करून दुकानातील एल.ई.डी. पॅनल – ०४, अॅम्पलीफायर,साऊंड बॉक्स असा एकुण २१,०००/ दोन्ही दुकानातुन एकुण ९६,०००/- रू चा मुद्देमाल चोरून नेला वरून पोलिस स्टेशन धारणी येथे अप.क्रं.०७/२३ कलम ४५७,८० भा.दं.वी. प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा तपास धारणी पोलिसांनी जलदगती करून परिसरातील सी.सी.टी.व्ही. तपासणी करून तसेच तांत्रीक विश्लेषणा व्दारे दि.०२/०१/२०२४ रोजी माहीती प्राप्त करून आरोपी नामे अरविंद संतुलाल मावस्कर, वय १९, रा. हरदोली यास अटक करून वरीलप्रमाणे गुन्हात गेलेला संपुर्ण मुद्देमाल किं.९६०००/- व गुन्हयात वापरलेली मोटारसायकल किं.६०,०००/- असा एकुण १,५६,०००/- रूचा जप्त करून गुन्हा उघडकीस आणलेला आहे.
सदरची कार्यवाही विशाल आनंद, पोलिस अधिक्षक, अमरावती .विक्रम साळी, अपर पोलिस अधिक्षक,अमरावती,अतुलकुमार नवगीरे, उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अशोक जाधव, पो.अमंलदार वसंत चव्हाण, चंद्रशेखर पाठक, सुहास डहाके, मोहीत आकाशे, जगत तेलगोटे, सम्राट
चव्हाण यांचे पथकाने केली आहे.









WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!