मध्यप्रदेशातुन अमरावती येथे येऊन दुचाकी चोरी करायचा,चोरी करुन फरार व्हायचा पण यावेळी डाव फसला…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

अमरावती प्रतिनिधी) – सवीस्तर व्रुत्त असे की  दि.२२/११/२०२३ रोजी स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रामीन चे पथक मोटर सायकल चोरणा-या आरोपींबाबत माहीती घेत असता पथकाला गोपनिय खबर मिळाली कि, सागर शेलुकर रा. बेलकुंड, मध्यप्रदेश याने होन्डा शाईन कंपणीची मोटर सायकल चोरली आहे आणि तो सध्या  तिच  मोटरसायकल घेवुन घाटलाडकी येथे विकण्याकरीता आलेला आहे. अशा गोपनिय खबरेवरुन स्थानिक गुन्हे शाखेचे पथक त्याचा शोध घेणे कामी ग्राम घाटलाडकी येथे गेले असता खबरेप्रमाणे एक इसम संशयितरित्या होन्डा शाईन मोटर सायकल घेवुन दिसला. त्यास पंचासमक्ष शिताफीने ताब्यात घेवून त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव

सागर रामु सेलुकर वय २० वर्ष रा. बेलकुंड ता.आठनेर जि.बैतुल, राज्य- मध्यप्रदेश





असे सांगितले. त्यास त्याचे जवळ असलेल्या होन्डा शाईन मोटर सायकल बाबत विचारणा केली असता त्याने आधी उडवाडवीचे उत्तरे दिली परंतु त्यास मोटर सायकलचे कागदपत्राची मागणी करुन गुन्हयासंबधाने विश्वासात घेवुन विचारपुस केली असता त्याने गुन्हयाची कबुली देवुन सांगितले कि, त्याने मोर्शी येथील होन्डा शाईन कंपनीची मोटर सायकल क. MH 27 BA 8015 व ब्राम्हणवाडा जवळील वणी गावातुन होन्डा शाईन मोटर सायकल क. MH 27CQ 6531 चोरुन आणली आहे. आरोपीने दिलेल्या कबुली वरुन अभिलेखाची पाहणी केली असता खालील मोटर सायकल चोरीचे गुन्हे उघडकिस आले आहे.
(०१) पो.स्टे. मोर्शी गुन्हा रजि.नं. २४०/२२ कलम ३७९ भादवि
(होन्डा शाईन कंपणीची ग्रे रंगाची मो.सा.क. MH 27 BA8015)
०२) पो.स्टे. ब्राम्हणवाडा गुन्हा रजि.नं. १५३/२०२० कलम ३७९ भादवि (होन्डा शाईन कंपणीची ग्रे रंगाची मो.सा.क. MH 27CQ 6531)
तसेच आरोपीची घरझडती घेतली असता आरोपीचे घरी बेलकुंड, मध्यप्रदेश येथे कागदपत्र नसलेल्या हिरो होन्डा कंपणीच्या चोरी केलेल्या दोन मोटर सायकल मिळुन आल्या सदर गाडया कोठुन चोरी गेल्या याबाबत तपास सुरु असुन आरोपी कडुन आतापर्यंत एकुण ०४ मोटर सायकल कि.अं. २,००,०००/- रु च्या मिळुन आल्या असुन त्या पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहे. आरोपीकडुन मोटर सायकल चोरीचे अधिक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता आहे. आरोपीस पुढील कार्यवाही कामी पो.स्टे. ब्राम्हणवाडा यांचे ताब्यात देण्यात आले असुन पुढील तपास ब्राम्हणवाडा पोलिस करीत आहे.
सदरची कामगिरी  अविनाश बारगळ पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा. शशिकांत सातव अप्पर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा., यांचे मार्गदर्शनात किरण वानखडे, पोलिस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा अमरावती ग्रा. यांचे नेतृत्वात सहा.पो. निरीक्षक सचिन पवार, पोलिस अंमलदार युवराज मानमोठे,रविंद्र व-हाडे, सागर नाठे, शांताराम सोनोने, चालक मंगेश मानमोडे, सागर धापड यांनी केली.







WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!