वयोव्रुध्द नागरीकांना वेगवेगळ्या बहाण्याने लुटणार्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
वरिष्ठ नागरीकांना हेरून फसवणुक करणारा अट्टल चोरट्यास स्थागुशा पथकाने केले जेरबंद….
अमरावती(ग्रामीण प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(२०) रोजी फिर्यादी गणेशराव दत्तुजी चव्हाण, रा. लासुर यांनी तक्रार दिली की, अज्ञात इसमांने त्यांना गावी सोडुन देतो अशी बतावणी करून स्वतःचे गाडीवर बसवुन नेले व रस्त्यात
त्यांना दारू पाजली त्यामुळे फिर्यादीस गुंगी आली व ते झोपले असता सदर आरोपीने त्यांचा मोबाईल किं.अं.१००००/- व हातातील ०२ सोन्याच्या अंगठया अंदाजे किंमत २००००/- रूच्या असा एकुण ३००००/- रूचा माल चोरून नेला. वरून पो.स्टे.दर्यापुर येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. यापुर्वी सुध्दा अश्याप्रकारचे गुन्हयाची पध्दत असलेले गुन्हे पो.स्टे. दर्यापुर येथे घडलेले असल्याचे अभिलेखावरून दिसुन येते.सदर घटनेचे व गुन्हयाची पध्दत याचे गांभीर्य पाहता .विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती
ग्रा. यांनी नमुद गुन्हयातील आरोपी निष्पन्न करून तात्काळ गुन्हा उघडीस आणण्याचे आदेशित व त्याकरिता पो.स्टे. दर्यापुर व स्था.गु.शा. येथील पथकांना मार्गदर्शन केले होते.
स्था.गु.शा.चे पथकाने सदर गुन्हयाचा समांतर तपास करित असतांना घटनेच्या मार्गावरील सर्व सि.सि.टि.व्ही.ची तपासणी केली तसेच गुप्त बातमीदार नेमुण माहीती संकलीत केली असता सदर गुन्हा हा आरोपी सुमित खांडेकर, रा. हसनापुर याने केला असल्याची माहीती प्राप्त झाल्याने नमुद आरोपीस ताब्यात घेवून विचारपुस केली असता त्याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली परंतु त्याला विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने सदरच्या
गुन्हात फिर्यादीस कोल्ड्रींक मध्ये दारू पाजुन तो बेशुध्द झाल्यावर त्याचा मोबाईल व सोन्याच्या अंगठया घेवुन पसार झाल्याची कबुली दिली आहे. नमुद आरोपीस अधिक विचारपुस केली असता त्याने सदर पध्दतीने पो.स्टे. दर्यापुर येथे दाखल अप.क्रं.१) ११८/२४२) ६६/२४ ३)८८/२२ असे एकुण ०३ गुन्हे केले असल्याची कबुली दिली आहे. आरोपीचे ताब्यातुन गुन्हयातील चोरी गेलेला मोबाईल व सोने असा एकुण १,६४,०००/- रूचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही.विशाल आंनद, पोलिस अधिक्षक, अमरावती, पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा, यांचे मार्गदर्शनात पो.नि.किरण वानखडे यांचे नेतृत्वातीलपो.उप.नि.संजय शिंदे, पोशि त्र्यंबक मनोहर, सुनिल महात्मे, सैय्यद अजमत, दिनेश कनोजीया, सुधीर बावणे, सागर धापड महीला अमंलदार सारिका
चौधरी, चालक संजय गेठे यांचे पथकाने केली आहे.