परतवाडा पोलिसांनी दोन तासाचे आत केला घरफोडीचा उलगडा…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

घरफोडी करणारे काही तासातच गजाआड..

अमरावती (प्रतिनिधी) – जुगार, घरफोडी, वाहन चोरी, अवैध धंदे, विनापरवाना शस्त्र, यांसारख्या घटनांमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्या आधीच हा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी सर्व पोलिस अधिकाऱ्यांना या आधी झालेल्या गुन्ह्यांची, तसेच चालु असलेले अवैध धंदे, गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना दिल्या होत्या.





दि.०१ जानेवारी २०२३ रोजी रात्री दरम्यान अज्ञात आरोपीतांनी फिर्यादी संतोष भैय्यालाल बेठे, (वय ४५ वर्ष), रा.येणी पांढरी यांचे घराचा कुलुप कोंडा तोडुन आत प्रवेश करून घरातील कपाटातुन चांदीचे कडे-०२, सोन्याची नथ व गहुचे कट्टे असा एकुण ५४,८००/- रू.चा माल चोरून नेला होता. फिर्यादीचे तक्रार वरून पो.स्टे. परतवाडा येथे अप क्रं.०६/२४ कलम ४५४,४५७,३८० भा.दं.वी. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता.



सदर गुन्हयाचा तपास परतवाडा पोलिसांनी जलदगतीने करून दि.०२जानेवारी २०२४ रोजी गोपनीय माहीती प्राप्त केली. २ इसम वाहन क्र.एम.एच.४३/ए.डी.८५९४ मध्ये गव्हाचे कट्टे विक्री करिता घेवुन जात आहेत, वरून परतवाडा पोलीसांनी सदर वाहन कृषी उत्पन्न बाजार समिती, अचलपुर येथे थांबवुन तपासणी केली असता सदर वाहनात चोरी गेलेला मुद्देमाल चांदीचे कडे-०२, सोन्याची नथ व गहुचे कट्टे असा एकुण ५४,८००/- रू.चा मिळून आला. सदर वाहनातील इसम नामे १) गजानन ऊर्फ आकाश रमेश क्षिरसागर, (वय २०) २) चेतन साहेबराव धोटे, (वय १९) दो.रा. येणी पांढरी यांना विश्वासात घेऊन अधिक विचारपुस केली असता वर नमुद गुन्हा त्यांनीच केला असल्याची कबुली दिली.



सदरची कार्यवाही विशाल आनंद पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रामीन  विक्रम साळी अपर पोलिस अधिक्षक अमरावती, अतुलकुमार नवगीरे उप-विभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनात संदीप चव्हाण, स.पो.नि, पो.उप.नि.विठ्ठल वाणी, पो.अंमलदार सुधिर राऊत, उमेश सावरकर, मनिष काटोलकर, विवेक ठाकरे, जितेश बांबील, धनश्याम किरोले यांच्या पथकाने केली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!