गुंतागुंतीच्या खुन प्रकरणाचा उलगडा करण्यात परतवाडा पोलिसांना यश…
अकस्मात मृत्यु प्रकरणात परतवाडा पोलीसांकडून शिताफीने तपास करुन खुनातील आरोपीला ठोकल्या बेड्या…
परतवाडा(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की,
18/10/2023 रोजी पोलिस स्टेशन ला फिर्यादी सागर सकल भलावी वय 24 वर्ष रा. केदारनगर,देवमाळी, परतवाडा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन मृतक सुकलाल ऊर्फ सोकाली मलाजी उईके वय 60 वर्षे रा.तळवेल, ता. चांदुर बाजार जि. अमरावती यांचे मरणाबाबत मर्ग क्रमांक 49/2023 कलम 174 जाफौ प्रमाणे
दाखल करण्यात आला. सदर मर्ग चौकशी दरम्यान घटनास्थळावर कुठलाही परीस्थितीजन्य पुरावा आढळून आला नाही. तसेच सदर मृत व्यक्ती याचे प्रेत हे कुजलेल्या अवस्थेत असल्याने प्रेताचे शरीरावर मारहाणीच्या कुठल्याही खुना नव्हत्या. सदर प्रकरणात दिनांक 18.10.2023 रोजी परतवाडा पोलिस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला होता व त्यानुसार
सदर प्रकरणाच्या चौकशी दरम्यान प्रत्यक्ष घटनास्थळावरील साक्षीदाराकडील चौकशीत असे दिसुन आले की, मयत मिळुन आलेल्या संडासचे टाकीचे वरील बाजुस असलेल्या 1.5 बाय 2 फुट लांबी रुंदींचे मेनहोल वर लोखंडी सेट्रींगची प्लेट ठेवलेली होती व टाकीचे आतमध्ये मृतदेह होता. त्यावरुन मृतकाचा काहीतरी घातपात करुन संडासचे टाकीत त्याला टाकण्यात आले असावे, असे प्राथमीक संशय आला होता.तसेच चौकशी दरम्यान तपासलेले साक्षीदार यांनी मृतक हा मोबाईल वापरत असल्याचे सांगीतल्याने मयताच्या मोबाईल चा बारकाईने तो राहत असलेल्या झोपडीमध्ये व आजुबाजुच्या परीसरात शोध घेतला परंतु मयताचा मोबाईल मिळुन आला नाही. त्यामुळे संशय अधिकच बळावला होता.
रात्रगस्त कामी असलेल्या पोलिस शिपायाच्या सतर्कते मुळे चौकशीला मिळाले नवे वळण….
पोलिस ठाणे परतवाडा येथील पोलिस शिपाई अल्केश शंकरराव इंगळे हे दिनांक 14.10.2023 रोजी रात्रगस्त डयुटीवर असतांना महाकाली नगर, देवछाया रोड, देवमाळी परतवाडा म्हणजे अगदी घटनास्थळा जवळच आरोपी हे संशयास्पद स्थितीत फिरत असतांना मिळून आल्याने त्यांनी त्यांची चौकशी करुन स्वतच्या
मोबाईल मध्ये त्यांचा फोटो काढला होता. सदर फोटोतील व्यक्तीचा कसुन शोध घेवून शोधपत्रिका तयार करण्यात आली. यातुनच दि.08.12.2023 रोजी आरोपीस पकडण्यात यश आले आहे.
तपासात तांत्रीक मदत घेवून आरोपी निष्पन्न करण्यात यश आले
मयताचा मोबाईल हा घटनास्थळावर व इतरत्र मिळून न आल्याने सदर मोबाईलचा तांत्रीक तपास करुन विश्लेषण करण्यात आले. सदर विश्लेषणाचे आधारावर यातील आरोपी नितेश रामसिंग वर्मा रा. गोलुखेडी म.प्र. याचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
आरोपीचा शोध घेण्यासाठी तिन पथके स्थापण करण्यात आली.
सदर आरोपी नितेश रामसिंग वर्मा वय 20 वर्ष, रा. गोलुखेडी ता. इशावर जि. सिहोर म.प्र. हा निष्पन्न झाल्यावर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस ठाणे स्तरावर तिन पथके स्थापण करण्यात आली. परंतु गुन्हयाच्या घटनेनंतर आरोपी हा कुठलाही मोबाईल वापरत नव्हता. तसेच
त्याच्या शोधकामी मागील महिनाभरापासुन तिनही पथकांनी मध्यप्रदेश, तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यामध्ये शोध घेतला. परंतु तो मिळून येत नव्हता
पोलीसांच्या प्रयत्नांन अखेर यश…
आरोपी हा त्याच्या कुटुंबासह दिनांक 08.12.2023 रोजी परतवाडा बस स्टॅड येथे आल्याची माहीती मिळाल्याने परतवाडा पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केली असता आरोपी हा देवमाळी परीसरातच एका बांधकामावर चौकीदार होता. दिनांक 12/10/2023 रोजी काही कारणास्तव परतवाडा येथून बाहेरगावी जावुन दि. 14.10.2023 रोजी रात्री 10.00 वा चे सुमारास परतवाडा येथे आल्यावर त्याचे सामान त्याच्या झोपडीत न दिसल्याने बाजुलाच असलेल्या मयताचे झोपडीत गेला असता त्याचे काही सामान त्या ठिकाणी दिसले. तेव्हा आरोपीने मयताकडे त्याच्या उर्वरीत सामानाची मागणी केली असता त्यातुन आरोपी व मयताचा वाद होवुन आरोपीने साहित्य परत देत नसल्याच्या कारणावरून स्वतःच्या उजव्या हातातील लोखंडी कडे हातातुन बाहेर काढुन मुठी मध्ये धरुन मृतकाचे डाव्या चाळयावर मारुन त्यास जीवानीशी ठार केले व पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने मृतकास संडास चे पाण्याचे टाक्यामध्ये टाकुन त्या टाक्यावर जाणीवपूर्वक लोखंडी सेंट्रींग प्लेट झाकुन ठेवल्याचे तपासादरम्यान सांगीतले आहे. परतवाडा ठाणेदार संदीप चव्हाण घटनेचा पुढील तपास करीत आहेत.
सदरची कारवाई पोलिस अधीक्षक अमरावती ग्रामीण विशाल आनंद, अपर पोलिस अधीक्षक विक्रम साळी, प्रभारी उपविभागीय पोलिस अधिकारी अचलपुर अर्जुन ठोसरे यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार संदीप चव्हाण, सपोनी शिवहरी सरोदे, पोउपनि. विठ्ठल वाणी, प्रवीण मोरे, सफौ सुनिल काळे, पोहवा. नाजीम शेख, पोहवा. सुधिर राऊत, उमेश सावरकर, नापोशि. मनिष काटोलकर,
पोशि विवेक ठाकरे,जितेश बाबील, घनशाम किरोले, विनोद भुजबळ, अल्केश इंगळे यांनी केली.