खेळाडुंच्या वाहनाचा झालेल्या अपघात प्रसंगी मदत करणाऱ्या दुतांचा पोलिस अधिक्षकांनी केला सत्कार….

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

अपघातात जखमींना मदत करणा-या नागरिकांचा पोलिस
अधिक्षक अमरावती ग्रा. विशाल आनंद यांचे हस्ते सत्कार….

अमरावती(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(१८) रोजी सकाळी ०७.३० वा. दरम्यान अमरावती येथुन एकुण २३ तरूण मुले क्रिकेटचे सामने खेळण्याकरिता अक्षय चौधरी, रा. किरण नगर, अमरावती यांचे टेम्पो ट्रॅव्हलर वाहन क्रं. एम.एच.२७/बी.एक्स.१७५५ ने अमरावती येथुन यवतमाळकडे जात असतांना पो.स्टे.नांदगांव खं. हद्दीत ग्राम शिंगणापुर येथील चौफुलीवर नागपुर -औरंगाबाद फाटयावर औरंगाबाद कडुन रसायन घेवुन जाणारा टँकर क्रं.जी.जे.३९/टी ९३५३ चे चालकाने आपले वाहन भरधाव वेगाने चालवुन ट्रॅव्हलरला मधोमध घडक दिली असता सदर टॅव्हलरमधील ०४ तरूणांचा जागीच मृत्यु व १९ तरूण, टेम्पो ट्रॅव्हलरचा चालक जखमी झाले होते.घटनेची माहीती प्राप्त होताच परीसरात राहणारे नागरिक







१) उमेश पुडंलिक तळेकार



२) संजय दत्तात्रय सावदे रा.पाचोड

३) प्रंशात हरीदास देशमुख रा. शिंगणापुर,

४) ओंकारेश्वर पुंडलिकराव दरेकर रा. शिवणी,

५)ऋषीकेश प्रतापराव चोपडे रा.कोठोडा

६) गजानन दिनकरराव सानप रा. शिवर

७) मोरेश्वर शंकरराव पडलिकर रा.मंगरुळ चव्हाळा,

८) माधव किरण पुनसे रा.मंगरुळ चव्हाळा,

९) आसिफ शहा रा.मंगरूळ चव्हाळा,

१०) सुरज विजय चोपकर रा.शिवनी

यांनी कोणत्याही गोष्टीची पर्वा न करता त्वरीत घटनास्थळावर धाव घेवुन माणुसकिचा परीचय देत जखमींना त्वरीत उपचारार्थ रुग्णालयात दाखल करुन त्याचे प्राण वाचविण्याची मोलाची कामगिरी केली.

पोलीस अधिक्षक, अमरावती ग्रामिण विशाल आनंद यांनी सदर नागरीकांचे कार्याची दखल घेवून त्यांचा उत्साह वाढावा तसेच त्यांच्या कार्याचा उचित सत्कार व्हावा म्हणुन त्यांना दि.(२३)रोजी पोलिस अधिक्षक कार्यालयात बोलावुन विशा आनंद पोलीस अधिक्षक अमरावती ग्रा.व  पंकज कुमावत, अपर पोलिस अधिक्षक, अमरावती ग्रा.यांचे हस्ते पुष्पगुच्छ व प्रशस्ती पत्र देवून गौरविण्यात आले आहे.
नागरिकांनी अपघाताच्या किंवा इतर गुन्हयाचे वेळी पिडीतांना सदबुध्दीने मदत केल्यास त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही म्हणुन अपघातातील/गुन्हयातील पिडीतांना त्वरीत मदत देण्यास नागरिकांनी नेहमी समोर येण्याचे आवाहन अमरावती ग्रा.पोलीसांव्दारे करण्यात येत आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!