गोंवश तस्करी करणारी टोळी लागली वरुड पोलिसांच्या हातात,३७ जनावरांची केली सुटका….
वरुड(अमरावती ग्रामीण) प्रतिनिधी – सवीस्तर व्रुत्त असे की
अमरावती ग्रामीण जिल्हयात वाढत्या गोवंश तस्करी घटना पाहता सदर घटनांना आळा बसावा याकरीता पोलिस अधीक्षक यांनी मार्गदर्शन करुन कारवाई करण्याच्या सुचना निर्गमीत केल्या होत्या. पोलिस स्टेशन वरुड येथील पो.उप.नि. दिपक दळवी यांना गोपनिय बातमीदाराकडुन माहीती मिळाली की, ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने काही इसम गोवंश जातीचे जनावरे यांना निदर्यतेने एकमेकांना दोरीने बांधुन त्यांच्या हातातील बाबुच्या काठीच्या पुराणीने टोचुन मारहाण करीत अवैधरित्या कत्तली करीता विक्रीस घेवुन जात आहेत, मिळालेल्या माहीती वरुन पो.उप. नि. दिपक दळवी पो.स्टे. वरुड येथील पो.स्टाफ असे ग्राम पोरगव्हाण ते मोर्शी खुर्द या पांदन रस्त्याने जावुन नाकाबंदी केली
असता काही ईसम गोवंश जातीचे जनावरे यांना निदर्यतेने एकमेकांना दोरीने बांधुन त्यांच्या हातातील बाबुच्या काठीच्या पुराणीने टोचुन मारहाण करीत अवैध रित्या कत्तली करीता विक्रीस घेवून जात असतांना मिळुन आले. सदर ईसमांना थांबवुन त्यांचे नाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव
१) सै. सजाद से बबु वय ४६ वर्ष
२) सै. जलील सै. अमीर वय ३५ दोन्ही रा. नविन आमनेर
तसेच त्यांना त्यांचे ताब्यातील जनावरांबाबत खरेदी विक्री पावती, दाखला जनावरांचे मेडीकल याबाबत विचारपुस केली असता ते उडवा उडवीची उत्तरे देत होते. त्यांचे विचारपुस दरम्यान खात्री झाली की, सदर जनावरे हे कत्तलीसाठीच घेवून चालले आहेत. वरुन सदर आरोपीतांना ताब्यात घेवुन ३७ बैल किंमत ४,७८,१००/- रु चा जप्त करुन जनावरांची पशुवैद्यकिय अधिकारी वरुड यांच्या कडुन मारा बाबत वैद्यकीय तपासणी करुन श्री. गोपाळ कृष्ण गौरक्षण संस्थान वरुड येथे दाखल करण्यात आले. नमुद आरोपीतांविरुध्द पो.स्टे. वरुड येथे अप. क्र. ७०७ / २०२३ कलम ५ (अ), ५ (ब), ९ महाराष्ट्र प्राणी संरक्षण
अधिनियम सहकलम ११,(१) (क) प्राण्यांचा छळ अधिनियम, सहकलम ११९ मपोका अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
सदरची कार्यवाही पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधीक्षक, शशिकांत सावंत ,उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश पांडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस स्टेशन वरुड,पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांचे नेतृत्वात पोउपनि दिलीप वळवी अंमलदार जयश्री लांजेवार, गौरव गिरी, आशिष भुंते, सैनिक शाम गुजर, मनोहर यांनी केली.