पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला नाशिक गुन्हे शाखा युनीट २ ने घेतले ताब्यात……
पिस्टलसह काडतूस बाळगणाऱ्याला युनीट २ केली अटक…
नाशिक (शहर प्रतिनिधी) – अंबड परिसरात देशी बनावटीचे पिस्टल आणि काडतुस बाळगणाऱ्या आरोपीला नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट २ यांनी अटक केली आहे. या कारवाईत त्याच्याकडून २५ हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे. नाशिक शहर आयुक्तालयात पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त (गुन्हे) डॉ.सिताराम कोल्हे यांनी नाशिक शहरात अवैध अग्निशस्त्र बाळगणाऱ्या व्यक्तीचा शोध घेवुन कारवाई करण्याबाबत गुन्हेशाखा युनिट २ ला मार्गदर्शन करून आदेश दिले होते.
त्या अनुषंगाने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस शिपाई स्वप्नील बुंद्रे, महेश खांडबहाले यांना मिळालेल्या गोपनीय बातमीवरून (दि.१३मे) रोजी सापळा रचुन इसम गणेश पुंजाराम मते, (वय-२९ वर्षे), व्यवसाय- मनुरी, मुळ रा.मु.पो. मुरंबी, ता.ईगतपुरी, जि.नाशिक हा संभानी स्टेडीयमच्या गेट समोर, अश्विनगर, अंबड, नाशिक येथे येणार असल्याची बातमी वरून त्यास ताब्यात घेतले असता त्याचे अंगझडतीत कमरेला एक देशी बनावटीचे पिस्टल (अग्निशस्त्र) व एक काडतुस बाळगताना मिळून आले त्याला ताब्यात घेवुन त्याचे कडुन एकूण २५,५००/-रू. किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त संदीप कर्णिक पोलिस उपायुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव, सहा.पोलिस आयुक्त गुन्हे डॉ.सिताराम कोल्हे, यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हेशाखा युनिट २ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार, सफौ विवेकानंद पाठक, पो.हवा मनोहर शिंदे, परमेश्वर दराडे, पोशि स्वप्नील जुंद्रे, विशाल कुवर, समाधान वाने, महेश खांडबहाले, तेनस मते, प्रविण वानखेडे, यांनी केलेली आहे.