
अश्विनी बिंद्रे यांचे मारेकर्यांना मिळणार जामीन ???
नवी मुंबई : सद्रक्षणाय खलनिग्रहणाय! हे ब्रीदवाक्य असणाऱ्या महाराष्ट्र पोलीस दलातील खलनायकांच्या प्रवृत्तीमुळे सहाय्यक पोलिस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणाने नवनवीन वळणे घेतली आहेत. या प्रकरणात बाजू मांडणारे विशेष सरकारी वकील प्रदीप घरत त्यांच्या अभ्यासपूर्ण युक्तिवादामुळे बिंद्रे कुटुंबीयांना
न्याय मिळण्याच्या आशा पल्लवित झालेल्या असतानाच राज्याचे गृहखाते आणि नवी मुंबई पोलिसांनी घरत यांचे थकीत मानधन 3 महिने झाले तरी न दिल्याने त्यांनी सुनावणीला येण्यास नकार दिला आहे. अशी माहीती सुत्राकडुन मिळतेय त्यांनी शासनास कळवूनही कोणतीही पावले उचलण्यात आलेली नाहीत.त्यातच या हत्याकांडातील दोन नंबरचा संशयित आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू उर्फ ज्ञानदेव पाटील यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्या अर्जावर येत्या शुक्रवारी 13 ऑक्टोबर रोजी निर्णय होणार आहे. जर सरकारी वकीलच बाजू
मांडण्यासाठी न्यायालयात नसतील तर यातील आरोपींचा
जामिनाचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी भीती अश्वीनी बिॅद्रे यांचे पती राजू गोरे यांनी व्यक्त केली आहे. विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांना देण्यात येणाऱ्या थकीत मानधनापैकी नवी मुंबई पोलिसांनी 15 लाख 90 हजारांचे मानधन दिले, मात्र उर्वरित मानधन जुलै महिन्यात देण्यात येईल, असे सांगण्यात आले. परंतु चौथा महिना उजाडला तरी पोलिसांनी एकही रुपया दिलेला नाही.
स्वत: वकील घरत यांनी आणि बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी मुख्यमंत्री, गृहखाते आणि नवी मुंबई पोलिसांना निवेदन देऊन थकीत मानधनाची मागणी केली आहे. परंतु ती पूर्ण न झाल्याने सप्टेंबर महिन्यापासून वकील प्रदिप धरत न्यायालयात सुनावणीला हजर राहिले नाहीत. अश्विनी बिंद्रे खून प्रकरणाची सुनावणी अंतिम टप्प्यात आली आहे. परंतु गृहखाते, मुख्यमंत्री आणि नवी मुंबई पोलिसांची अनास्था आरोपींना बळ देणारी असल्याचा आरोप राजू
गोरे यांनी केला आहे.जर हे असच सुरु राहील तर आम्ही उच्च न्यायालयाचे दार ठोठाऊ असेही ते बोलले सुरुवातीपासूनच नवी मुंबई पोलिसांची भूमिका ही संशयास्पद व आरोपींना मदत करणारी राहिली आहे. हीच मदत म्हणजे नवी मुंबई पोलिसांच्या आशीर्वादाने माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा संशयित आरोपी राजू पाटील याचा जामीन अर्ज दाखल झाला आहे. सरकारी वकिलांच्या अनुपस्थितीत संशयिताचा जामीन मंजूर झाल्यास गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह गृहसचिव आणि नवी मुंबईचे पोलीस आयुक्त, पोलिस महासंचालकांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका
दाखल करण्याचा इशारा अश्विनी बिंद्रे यांचे पती राजू गोरे यांनी दिला आहे. मागील 6 महिन्यांपासून गृह विभाग आणि संबंधित सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला आहे. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नसल्याचे गोरे यांनी सांगितले.


