कत्तलीसाठी गोवंशीय जनावरांची वाहतुक करणारे बीड ग्रामीण पोलिसांचे ताब्यात…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

कत्तलीकरीता जाणा-या गोवंशीय जनावरांची बीड ग्रामीण पोलिसांनी पाठलाग करुन केली सुटका,६गोवंशीय जनावरांची केली गोशाळेत केली रवानगी….

बीड(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की, दि.(28)सप्टेंबर 2024 रोजी संध्या ६.00 वा. सपोनि बाळराजे दराडे हे पोलिस स्टेशन बीड ग्रामीण परीसरात पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, मांजरसुंबा रोडने पिकअप क्र.MH-23W3960 पांढ-या रंगाचे महींद्रा कंपनीचे यामध्ये अंत्यंत निर्दयतेने गोवंशीय जनावरांची निर्दयतेने वाहतुक होतेय अशा मिळालेल्या गोपनीय बातमीवरुन पथकाने नाकाबंदी करुन सोलापुर धुळे हायवेवर  पिकअप क्र.MH-23W3960 भरधाव वेगाने बीडकडे येत असताना दिसताच त्याचा पाठलाग करुन त्यास आहेरवडगाव फाटा नक्षत्र हाँटेल समोर धुळे सोलापुर हायवेवर पोलिस वाहन आडवे लावुन त्याला थांबवले असता सदर पिकअप गाडीमध्ये एकुण 6 गायी अत्यंत निर्दयतेने दोरीला घट्ट बांधुन त्यांना कुठल्याही चारापाण्याची सोय न करता त्यांना पुरेशी जागा न ठेवता तसेच जनावराचे डॉक्टरचे प्रमाणपत्राशिवाय विनापरवाना वाहतुक करित असल्याचे दिसुन आले



म्हणुन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव जाबेर कटुभाई पठाण वय 50 वर्षे रा. शहेनशावली दर्गा अचानक नगर पेठ बीड यास गाडीचे खाली उतरवुन सदर जनावराचे मालकी हक्काबाबत विचारले असता त्याने सदरचे जनावरे हे सत्तार कुरेशी रा. मोमीनपुरा ता.जि.बीड याचे असल्याचे सांगितले सदर चालकास ताब्यात घेवुन पिकअप क्र.MH-23W3960 यासह पोलिस स्टेशनला आणुन त्यांचेविरुध्द प्राण्यास छळ प्रतिबंधक अधिनियम 1960 चे कलम 11 (1) 11 (1) (j) आणि प्राण्याचे परिवहन नियम 1978 चे कलम 47,48,49, महाराष्ट्र मोटार वाहन नियम 1989 चे कलम 119 अन्वये फिर्यादी पोउपनि काकरवाल यांचे फिर्यादीवरुन पोलिस ठाणे बीड ग्रामीण येथे गुन्हा नोंद करण्यात आला. एकुण 6 गायीसह पिकअप असा एकुण 532000/- रु किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला असुन सदर गायी शिवदरा येथील गो शाळेत पुढील सांभाळाकरिता ठेवण्यात आल्या आहेत.



सदरची कारवाई पोलिस अधिक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, पोलिस उपअधिक्षक विश्वंभर गोल्डन, पोनि शिवाजी बंटेवाड, यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि बाळराजे दराडे, पोउपनि काकरवाल, कुकलारे, पोहवा मुंडे,अलगट,नापोशि शेख, झुनगुरे, पोशि निर्धार यांच्या पथकाने केली





तसेच अशा प्रकारे जणावराची निर्दयतेने कोणी वाहतुक करत असेल तर बीड ग्रामीण पोलीसांना तात्काळ माहीती द्यावी असे आव्हान बीड ग्रामीण पोलीसांनी जनतेला केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!