धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

धक्कादायक! बीड पोलिस दलातील अधिकाऱ्याचेच केले होते फेसबूक अकाऊंट हॅक; अशी घ्या काळजी…

पुणे (प्रतिक भोसले) – फेसबुक किंवा इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी, काही चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी कितीही फायदेशीर ठरत असल्या, तरी याचा वापर काळजीपूर्वक न केल्यास मोठा फटका बसू शकतो. सध्या फेसबुकसारख्या अनेक सोशल मीडिया साईट्सवर अनेक सायबर क्रिमिनल्स युजर्सला आपल्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. फेसबुकवर अनेकांचे प्रोफाईल हॅक करुन, युजरच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांकडे पैसे मागण्याचं प्रमाण वाढलं आहे. तसंच सायबर पोलिसांकडे फेसबुक प्रोफाईल हॅक झाल्याच्या तक्रारीही वाढल्या आहेत. डॉक्टर, पोलीस, वकील यांची बनावट प्रोफाईल तयार करुन त्यांच्या नावाखाली पैशांची मागणी केली जात असल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. चार महिन्यांपूर्वी धाराशिव पोलिस दलात कार्यरत असताना सहायक पोलिस निरीक्षक यांचे अकाऊंट हॅक केले होते ज्यांची बीड येथील एका पोलिस ठाण्यात बदली झाली आहे. (नाव गाव गोपनीय) यांचे फेसबुक अकाउंट हॅक करुन त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील अनेकांकडे पैसे मागण्यात आले होते. परंतु या प्रकरणी संशय आल्यानंतर त्यांच्या फ्रेंडलिस्टमधील लोकांनी त्यांना प्रत्यक्ष संपर्क केल्यानंतर, पैसे मागितले नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशा प्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.





सध्या पुणे शहरातील नामवंत डॉक्टर, वकील, व्यावसायीक, शासकीय अधिकारी/कर्मचारी व इतर नामवंत व्यक्तींचे फेक फेसबुक अकाउंट बनवुन त्यांच्या फ्रेंड लिस्ट मधील मित्र-मैत्रीण तसेच नातेवाईक यांना सदर फेक फेसबुक अकाउंट वरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवुन त्यानंतर पैशाची मागणी करीत असलेबाबत सायबर पोलिस स्टेशन येथे तकारी प्राप्त होत आहेत. असे आपणासोबत झाल्यास आपण खालील प्रमाणे प्रोसेस करून सायबर पोलीस स्टेशन येथे तक्रार द्यावी असे आवाहन उमेश तावसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे पुणे ग्रामीण यांनी नागरिकांना केले आहे.



ज्यांची फेक फेसबुक प्रोफाईल बनवली आहे त्यांनी आपल्या स्वतःच्या फेसबुक अकाऊंटवरुन बनवलेली फेक प्रोफाईल शोधा, स्वतःला शोधता येत नसेल तर ज्या मित्रांना त्या प्रोफाईलवरुन रिक्वेस्ट गेली आहे, त्यांच्याकडुन सदर फेक प्रोफाईलची फेसबुक लिंक (युआरएल) मागवुन घ्या,



• त्या प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.

• तुमच्यासमोर Find Support Or Report Profile हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

• Pretending To be Someone हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

• पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity.

आपण आपलीच बनवलेली फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी Me हा ऑप्शन सिलेक्ट करा, आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

इतरांनी सदरची प्रोफाईल फेक रिपोर्ट करताना –

• प्रोफाइलवर गेल्यानंतर प्रोफाईल वर उजव्या बाजुला तीन डॉट (:) दिसतील, त्या डॉटवर क्लिक करा.

• तुमच्यासमोर Find Support Or Report हा ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

• Fake Account हा पहिला ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करा.

• पुढे तुम्हाला ३ ऑप्शन दिसतील, Me, A Friend आणि Celebrity.

• आपण मित्राची फेक प्रोफाईल रिपोर्ट करत असल्याने त्यापैकी A Friend हा ऑप्शन सिलेक्ट करा आणि नेक्स्ट करा, फेक प्रोफाईल अकाउंट काही वेळाने बंद होईल.

फेसबुक प्रोफाईल सुरक्षीत कसे करावे –

स्वतःची फेसबुक फ्रेंडलिस्ट अनोळखी व्यक्तीला दिसु नये याकरीता – Settings & Privacy Setting → How People Can शोधा आणि तुमच्याशी संपर्क साधा → तुमची फ्रेंड लिस्ट कोण पाहू शकते, फक्त मीच करावे

स्वतःची फेसबुक प्रोफाईल फोटो/कव्हरपेज फोटो अनोळखी व्यक्ती Copy/Download करू नये याकरीता – Settings & Privacy Setting → Profile Locking Lock Your Profile तिथे करावे.

अनोळखी व्यक्तीने आपल्याला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू नये या करीता सेटिंग्ज आणि प्रायव्हसी सेटिंग → लोक तुम्हाला कसे शोधू शकतात आणि तुमच्याशी संपर्क साधू शकतात जे फ्रेंड रिक्वेस्ट पाठवू शकतात, फ्रेंड ऑफ फ्रेंड करावे,

स्वतःचा फेसबुक अकाउंट सुरक्षीत ठेवणे या करीता – Settings & Privacy Setting → Pasword and Security Use Two-Factor Authentication तिथे योग्य पर्याय निवडून Continue वर क्लिक करावे.

स्वतःचा फेसबुक प्रोफाईल वरिल आपला ई-मेल आयडी कोणास दिसु नये या करीता – Settings & Privacy Setting → Parsnal and Account information Contact Info. तेथे नमूद मेल आयडीवर लक who can see your Email Address ? → तिथे Only Me करावे.

स्ट्राँग पासवर्ड सुरक्षीत पासवर्ड –

पासवर्ड हे हॅकर्सच्या विरूद्ध तुमच्या सुरक्षिततेचे पहिले पाऊल आहे. त्यामुळे तुम्ही एक मजबूत आणि युनिक असा पासवर्ड निवडणे महत्वाचं आहे ज्याचा अंदाज लावणं कोणालाही सोपं नसेल. पण तुम्हाला तो लक्षात राहणंही महत्त्वाच आहे. तुमची जन्मतारीख, नाव, कार नंबर इत्यादींचा पासवर्ड म्हणून कधीही वापर करू नका. तसेच तुमच्या Facebook खात्याचा पासवर्ड इतर ठिकाणी पुन्हा वापरू नका किंवा इतरांशी शेअर करू नका.

तुमचं फेसबुक हे केवळ तुमच्याच डिव्हाईसमध्ये म्हणजे फोन किंवा पर्सनल लॅपटॉप या मध्येच लॉग इन करणं फायद्याचं आहे. विविध ठिकाणी हे अकाउंट लॉग इन केल्याने तुमच्या अकाउंटची सुरक्षितता घोक्यात येते. त्यामुळे तुमच्या पर्सनल डिव्हाईसेसशिवाय ददुसरीकडे लॉग इन करताना काळजी घ्या. विशेषत: दुसऱ्याच्या डिव्हाइसमध्ये लॉग इन केल्यावर बंद करताना आठवणीने लॉग आउट करा.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन –

तुमच्या फेसबुकला दुप्पट सुरक्षा देण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हा पर्याय देण्यात आला आहे. तुम्ही जर डेस्कटॉपवर फेसबुक उघडलं असेल, तर उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या आपल्या प्रोफाईल फोटोवर क्लिक करा. मोबाईल अ‍ॅपमधून यासाठी तुम्हाला डाव्या बाजूला खाली दिसणाऱ्या तीन डॉट्सवर टॅप करावे लागेल.

यानंतर ‘सेटिग्स अँड प्रायव्हसी’ यावर क्लिक करून, सेटिंग्स हा पर्याय निवडा. यानंतर उघडलेल्या पेजवर डाव्या बाजूला ‘पासवर्ड अँड सिक्युरिटी’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा. यानंतर समोर पुन्हा पासवर्ड अँड सिक्युरीटी हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक केल्यानंतर टू फॅक्टर ऑथेंटिकेशन हा पर्याय निवडा.

यानंतर तुम्हाला तुमचं अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, आणि पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काही ऑप्शन्स दिसतील. तुम्हाला कोणत्या प्रकारचं ऑथेंटिकेशन हवं आहे याचे हे ऑप्शन्स आहेत. यामध्ये टेक्स्ट मेसेज, ऑथेंटिकेटर अ‍ॅप, सिक्युरिटी की असे तीन पर्याय दिसतील. यातील टेक्स्ट मेसेज ऑथेंटिकेशन पद्धतीला सर्वात सुरक्षित मानतात.

तेव्हा फेक फेसबुक अकाऊंट वरून होणाऱ्या फसवणुकीबाबत दिलेल्या स्टेप्स नुसार प्रोसेस करून योग्य ती खबरदारी घेऊन काळजी घेण्याचे आवाहन उमेश तावसकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाणे पुणे ग्रामीण यांनी नागरिकांना केले आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!