
सराईत मोटारसायकल चोरट्यास स्थागुशा पथकाने घेतले ताब्यात,घरफोडी व चोरीचे गुन्हे केले उघड….
अट्टल मोटारसायकल चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद….
भंडारा (प्रतिनिधी) – जिल्हयात सतत वाढत्या मोटारसायकल चोरीचे प्रमाण पाहता पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर यांच्या नेतृत्वात स्थागुशा पथकाने मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करून आरोपी- करण परमानंद मानापुरे (वय २३ वर्षे), रा.बेलघाटा वार्ड, पवनी त. पवनी, जि.भंडारा याला अटक करून याच्या ताब्यातुन एकुण ५ मोटारसायकली ज्यांची एकुण किं.२,४५,०००/रू. या जप्त केल्या आहेत.


सदर आरोपीने पोलिस स्टेशन पालांदुर येथील जवेनाळा येथे बंद घरी चोरी केल्याचेही कबुल केल्याने पो.स्टे. पालांदुर येथील अप क्रं. ०८/२४ कलम ४५४,३८० भावि मधील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी नगदी ९५००/रू. रोख रक्कम हस्तगत केला. तसेच आरोपी याने पो.स्टे. पवनी अप क्रं. ५१/२४ कलम ३७९ भादवि गुन्हयातील मोटारपंप चोरी केल्याचे कबुली दिल्याने आरोपीस पुढील अधिक तपासाकरीता पो.स्टे. पवनी यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. एकंदरीत स्थानुशा पथकाने भंडारा, नागपुर शहर व चंद्रपुर जिल्हयातील असे एकुण ०५ मोटार सायकल चोरी, ०१ दिवस घरफोडी व ०१ मोटारपंप चोरी असे एकुण ०७ गुन्हे उघडकीस आणुन मुद्देमाल व आरोपी यास पुढील तपासकामी पोलिस स्टेशन पवनी यांच्या ताब्यात देवुन तपास सुरू आहे.

सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा. नितीन महाजन,राजेश पंचबुधे, नंदकिशोर मारबते, पोशि मंगेश माळोदे, जगदिश श्रावणकर,योगेश ढबाले (सर्व स्थागुशा भंडारा) यांनी केली आहे.



