
कत्तलीकरीता गोवंशाची वाहतुक करणारे स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात….
अवैधरित्या कत्तलीकरीता गोवंशीय जनावरांची वाहतुक करणाऱ्या दोन वाहनावर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कार्यवाही, एकुण 32,56,600/- रु. चा मुद्देमाल केली जप्त…
भंडारा(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधिक्षक नूरुल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व प्रभारिंना सर्व प्रकारचे अवैध धंद्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत आदेशीत केले होते त्यानुसार अवैध गोवंश वाहतुक व तस्करीची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे चे पोलीस निरीक्षक नितीन चिंचोळकर यांना मिळाली. त्याअनुषंगाने पोलिस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात दि 16 फेब्रुवारी रोजी स. पो. नि. शिरीष भालेराव, पो.हवा. दोनोडे, कठाणे, पो. शि. पेठे,ठाकरे, शहारे, चालक पो. शि. गजभिये यांना रवाना केले.


त्यानुसार जिल्हा परिषद चौक, भंडारा येथे नाकाबंदी करुन मिळालेल्या गोपनीय माहीतीनुसार साकोली कडुन भंडारा कडे येणाऱ्या दोन आयसर वाहनांना थांबवुन पाहणी केली असता ।) आयसर क्र. एमएच 40 सिटी 5445 मध्ये 13 व 2) आयसर क्र. एमएच 40 सिटी 4425 मध्ये 12 असे एकुन 25 गोवंश जातीचे जनावरे क्रूरपणे कोंबल्याचे दिसुन आले. सदरची जनावरे ही अवैधरित्या कत्तल करण्याचे उद्देशाने वाहतुक करण्यात येत असल्याने आरोपींवर कारवाई करण्याकरिता जनावरांना गौशाळेत सुरक्षिततेच्या दृष्टीने ठेवण्यात आली आहे.आयसर क्र. एमएच 40 सिटी 5445 चा चालक आरोपी नामे (1) मोहम्मद नवेद नौशाद कुरेशी, वय 22 वर्ष, रा. पानखाना बगीचा भाजीमंडी, कामठी, जिल्हा नागपुर व 2) वाहन मालक आरोपी तन्वीर रशीद कुरेशी रा. येरखेडा रोड कामठी तसेच आयसर क्र. एमएच 40 सिटी 4425 चा चालक नामे 3) जफर ईकब्बाल शेख इस्माइल शेख वय 52 वर्षे कुरेशी रा. पानखाना बगीचा भाजीमंडी, कामठी, जिल्हा नागपुर व वाहन मालक आरोपी नामे 4) फिरोज रशीद कुरेशी रा. येरखेडा रोड कामठी, नागपूर यांनी आयसर क्र. एमएच 40 सिटी 5445 व आयसर क्र. एमएच 40 सिटी 4425 मध्ये प्रत्येकी 13 व 12 असे एकुन 25 गोवंश जातीच्या जनावरांना क्रुरतेने कोंबुन भरुन अवैधरित्या वाहतुक करतांना मिळुन आल्याने त्यांच्या ताब्यातुन एकुण किं. 32,56,600/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सर्व आरोपी विरुध्द पोलिस स्टेशन भंडारा येथे अप. क्र. 143/2025 कलम 11 (1). (ड). (ज),(झ) प्राण्यांचा छळ प्रतीबंधक अधिनियम 1960, सह कलम 5 (अ). 9 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम, 1976, सह कलम 49 भा. न्या. सं. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास पोलिस स्टेशन भंडारा चे अधिकारी करीत आहे.

सदरची कार्यवाही पोलिस अधिक्षक नूरुल हसन, अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा चे पो. नि. नितीन चिंचोळकर, स. पो. नि. शिरीष भालेराव सोबत. पो.हवा. दोनोडे, पो. हवा. कठाणे, पो. शि. पेठे, पो. शि. ठाकरे, पो. शि. शहारे, चालक पो. शि. गजभिये यांनी केली.


