केसलेवाडा भंडारा येथील घरफोडीचा २४ तासात स्थागुशा पथकाने केला उलगडा,आरोपीस केले जेरबंद…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
Instagram Follow

घरफोडी करणारा चोरट्यास  २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात…

भंडारा (प्रतिनिधी) – घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्याला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपास करून शिताफीने अटक करण्यात भंडारा पोलिसांना यश मिळाले आहे. या प्रकरणी श्रीमती मीना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्षे), रा. न्यू शिवाजी नगर नहर रोड केसलेवाडा, भंडारा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी – पंकज श्रावण खाकरे (वय ३१ वर्षे), रा.पिंपळा फाटा, हुडकेश्वर नागपूर याच्यावर भा.दं.सं. कलम २६१/२०२४ कलम ४५४, ३८० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.





या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.१८ मार्च) रोजी न्यु शिवाजी नगर नहर रोड केसलेवाड़ा भंडारा येथे फिर्यादी नामे श्रीमती मिना सुदर्शन पवनीकर (वय ४३ वर्ष) यांचे राहते घरी अज्ञात आरोपीतांनी घरफोडी केल्याचे तक्रारीवरून पो.स्टे. भंडारा अप.क्र.२६१/२४ कलम ४१४, ३८० भादवि, वा गुन्हा नोंद करण्यात आला होता. सदर गुन्हयातील अज्ञात आरोपींचा शोध लावण्यासाठी पोलिस निरीक्षक नितीनकु‌मार चिंचोळकर, सहा.पोलिस निरीक्षक. नारायण तुरकुंडे, पो.हवा. प्रदीप डाहारे,  किशोर मेश्राम, सतीश देशमुख, उमेश बेदुरकर, अजय बारापात्रे, पो.शि शैलेश बेदुरकर या पथकाने संपुर्ण परिसरातील सि.सि.टि.व्हि. फुटेजची पाहणी करून अज्ञात आरोपींचे सि.सि.टि.व्हि. फुटेज प्राप्त केले व फुटेज मधील संशयीत आरोपीतांचा शोध घेत मौदा नागपूर परिसरातील घरफोडीचे आरोपी तपासले त्या तपासणी मध्ये स्था.गु.शा. पथकाला फुटेजमधील संशयीत इसम हे नागपूर येथील राहणारे



१) पंकज श्रावण खाकरे (वय ३१ वर्ष), रा.पिंपळा फाटा,



२) आकाश उर्फ गोलु दिलीप रेवाडीया (वय ३० वर्ष), रा.मानेवाडा

असे असल्याचे स्पष्ट होताच स्था.गु.शा. पथकाने नागपूर पिंपळा फाटा हुडकेश्वर येथे राहणारा पंकज श्रावण खाकरे (वय ३१ वर्ष) याला ताब्यात घेतले आहे. सदर आरोपीकडून केसलेवाडा येथील नमूद गुन्हयातील १,४०,०००/-रू. सोन्या-चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. सदर आरोपीकडून अधिक चौकशी दरम्यान आरोपीने भंडारा शहर परिसरातील १ गुन्हा आणि ग्रामीण परिसरातील १ असे दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. त्याने हे त्याचा साथीदार गोलू रेवाडीया याचेसोबत मिळून केल्याचे सांगीतले आहे. अटक आरोपी कडून एकूण ३ गुन्ह्यातील मुद्देमाल सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख एकूण १,७३,०००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील दुसरा आरोपी आकाश उर्फ गोलु दिलीप रेवाहीया (वय ३० वर्ष), रा.मानेवाडा याचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी ही पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नितीनकुमार चिंचोळकर, सहा.पो.नि. नारायण तुरकुंडे, पो.हवा. प्रदीप हाहारे, पो.हवा. किशोर मेश्राम, पो.हवा. सतीश देशमुख, पो.हवा. रमेश बेदुरकर, पो.हवा. अजय बारापात्रे, पो.अं. शैलेश बेदुरकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!