
कारधा पोलिसांचा गावठी मोहादारु निर्मीती भट्टीवर छापा…
कारधा पोलिसांचा दारू अड्डयावर छापा; एकाला अटक…
कारधा(भंडारा)प्रतिनिधी – कारधा पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून दारू अड्डयावर छापा टाकून आरोपी सुखदास अर्जुन केवट, (वय 48 वर्षे), रा.करचखेडा, ता. जि.भंडारा याला अटक करून त्याच्यावर 429/2024, कलम 123 भान्यासंसक-65 (फ), (ब), (क), (ड) (ई) मदाका अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत एकूण 40 हजार रु. मुद्देमाल हा जप्त केला आहे.


या बाबत अधिक माहिती अशी की, घटना दि. 02/10/2024 रोजी यातील फिर्यादी पोहवा दिलीप धावडे हे कर्तव्यावर हजर असताना आरोपी सुखदास अर्जुन केवट (वय-48 वर्ष), रा.करचखेडा ता.जि.भंडारा, हा त्याचे घराचे मागे वैनगंगा नदीचे काठावर युरीया मिश्रीत मोहफुलाची हा.भ. दारु गाळत आहे अशा गोपनीय खबरेवरुन पोलिस स्टेशन कारधा ठाणेदार पोनि गणेश पिसाळ यांनी पोलीस स्टाफ व पंचांच्या मदतीने यातील आरोपीवर छापा कार्यवाही केली असता त्याचे ताब्यात (1) लोखंडी खाली ड्रम-1 कि.600/- रु (2) जलावु काळ्या अंदाजे 12 मन किं. 2,400/-रु, (3) 1 रबरी ट्युबमध्ये अंदाजे 20 लीटर हा.भ. दारु भरलेली किं. 6,000/- रु. (4) एक जुनी जर्मन करची किं. 300/- रु. (5) एक नेवार पट्टी किं. 00.00/- रु. (6) एक टवरा किंमती 00.00/- रु (7) 7 प्लॉस्टिक पिशवीमध्ये प्रत्येकी 40 किलो व एका प्लॉस्टिक पिशवीमध्ये 30 किलो एकुण 310 किलो युरीया मिश्रीत सडवा मोहापास किं.100 रु. प्रमाणे कि. 31,000/- रु. असा एकुण 40,300/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कारवाई पोलिस अधिक्षक नूरुल हसन,अपर पोलिस अधिक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलिस अधिकारी भंडारा डॉ.अशोक बागुल, यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक गणेश पिसाळ, पोहवा.दिलीप धावडे, पोहवा. त्र्यंबक गायधने, नापोशि विकास जाधव, पोशी. अमोल वाघ, पोशी. आकाश सोनुने, चालक पोहवा. रत्नाकर लाडे, सर्व पोलीस स्टेशन, कारधा यांनी केली आहे.



