शेतातील मोटारपंप चोरणारी टोळी भंडारा गुन्हे शाखेच्या ताब्यात,११ गुन्हे केले उघड…

महाराष्ट्रातील महत्वाच्या क्राईम संबंधी बातम्यांसाठी आम्हाला जॅाईन करा
WhatsApp Group Join Now
Instagram Follow

भंडारा गुन्हे शाखेने मोटारपंप चोरट्यांना अटक करून केले ११ गुन्हे उघड…

भंडारा (प्रतिनिधी) – भंडारा गुन्हे शाखा अवैध धंद्यांची आणि नाउघड गुन्ह्यांची माहिती काढून कारवाईसाठी गस्तीस असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून कौशल्यपूर्ण तपासाच्या आधारावर मोटरपंप नाउघड गुन्ह्याचे घटनास्थळ भेटी दरम्यान गोपनीय माहितीवरून १) रोहीत सिध्दार्थ खोब्रागडे, (वय २० वर्ष), धंदा- मजुरी, २) सत्यपाल सिध्दार्थ खोब्रागडे, (वय ३१ वर्ष), धंदा- मजुरी, ३) शंकर चिंदु भोयर, (वय २४ वर्ष), धंदा- मजुरी, ४) हिरामन धनराज वाघाडे, (वय ४५ वर्ष), धंदा- कबाडी खरेदी विक्री, सर्व रा.किटाडी, ता. लाखनी, जि.भंडारा या ४ आरोपींना ताब्यात घेऊन ११ गुन्हे उघडकीस आणून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ०३ मोटरपंप, ०४ (डिजेल इंजीन) मोटरपंप, ०२ मोटरसायकल असा एकूण किंमती १ लाख रु. चा मुद्देमाल हा जप्त केला आहे.





या बाबत सविस्तर वृत्त असे की, (दि.१०जून) रोजी पोनि. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा. किशोर मेश्राम, पोअं. सचिन देशमुख, पोअं. कृणाल कडव, पोअं. योगेश ढबाले, चापोना. आशिष तिवाडे, चापोअं. कौशीक गजभिये सर्व स्थानिक गुन्हे शाखा भंडारा अश्या पथकाने मोटरपंप नाउघड गुन्ह्याचे घटनास्थळ भेटी दरम्यान गोपनीय खबरेवरून आरोपी १) रोहित सिध्दार्थ खोब्रागडे (वय २० वर्ष), २) सत्यपाल सिध्दार्थ खोब्रागडे (वय ३१ वर्ष), ३) शंकर चिंदु भोयर (वय २४ वर्ष), ४) हिरामण धनराज वाघाडे (वय ४५) सर्व रा.किटाडी यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांचे कडून १) पो.स्टे. साकोली अप.क्र.१५/०२४ कलम ३७९ भादवि., २) पो.स्टे. साकोली अप.क्र. २७/०२४ कलम ३७९ भादवि., ३) पो.स्टे. आंधळगाव अप.क्र. २१/०२४ कलम ३७९ भादवि., ४) पो.स्टे. लाखनी अप.क्र. १८/०२४ कलम ३७९ भादवि., ५) पो.स्टे. पालांदूर अप.क्र. ९३/०२४ कलम ३७९ भादवि., ६) पो.स्टे. पालांदूर अप.क्र. ९१/०२४ कलम ३७९ भादवि., ७) पो.स्टे. पवनी अप.क्र. १९६/०२२ कलम ३७९ भादवि., ८) पो.स्टे. अड्याळ अप.क्र. ६६/०२४ कलम ३७९ भादवि., ९) पो.स्टे. कारधा अप.क्र. १५५/०२४ कलम ३७९ भादवि., १०) पो.स्टे. अड्याळ अप.क्र. ४९/०२४ कलम ३७९ भादवि., ११) पो.स्टे. करडी अप.क्र. ३४/०२४ कलम ३७९ भादवि. असे एकूण ११ गुन्हे उघडकीस आणले आहेत.



आरोपीतांकडून वरील गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या मुद्देमालापैकी ०३ मोटरपंप, ०४ (डिजेल इंजीन) मोटरपंप, ०२ मोटरसायकल एकूण किं. १,०२,०००/-रु. चा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखा भंडारा पथकाने जप्ती पत्रकाप्रमाणे जप्त करून ताब्यात घेतला आहे. अशा प्रकारे वर नमुद आरोपीतांनी पोलीस स्टेशन पालांदुर, साकोली, आंधळगाव, लाखनी, पवनी, अडयाळ, कारधा, करडी अंतर्गत ११ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यावरून वर नमुद गुन्हयातील चोरीस गेलेले ०३ मोटरपंप, ०४ (डिजेल इंजीन) मोटरपंप, ०२ मोटरसायकल असा एकूण १,०२,०००/-रु. चा मुद्देमाल जप्ती कारवाई करून पुढील तपासाकरिता आरोपीतांसह पोलीस स्टेशन पालादुर यांचे ताब्यात दिला आहे.



अशा प्रकारे सदरची कारवाई पोलिस अधीक्षक लोहित मतानी, अपर पोलिस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनात पोनि. नितीनकुमार चिंचोळकर, पोहवा. किशोर मेश्राम, पोशि सचिन देशमुख, कृणाल कडव, योगेश ढबाले, चापोना.आशिष तिवाडे, चापोशि कौशिक गजभिये सर्व स्थानिक गुन्हे शाखा, भंडारा यांनी केलेली आहे.





WP2Social Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!