
लाखनी येथे स्थानिक गुन्हे शाखेने सुंगंधीत तंबाखुचा अवैध साठा केला जप्त…
लाखनी मध्ये स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकुन प्रतिबंधीत तंबाखूचा अवैध साठा केला जप्त…
भंडारा (प्रतिनिधी) – सिंधी लाईन परीसरात लाखनी पोलिसांनी कारवाई करून एका दुकानातून प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा अवैध साठा हस्तगत केल्याची बाब उघडकीस आली आहे. प्राप्त माहीतीनुसार, लाखनी पोलिसांना गुप्त सूत्राद्वारे मिळालेल्या माहीतीवरून सदर कारवाई केली आहे. आरोपी रामु गोविंदराव गुरूनानी (वय 49 वर्षे), रा.प्रभाग क्र.1 लाखनी यांचे लाखनी येथील सिंधी लाइन परीसरात किराणा दुकान आहे. गुप्त माहीतीच्या आधारे त्यांच्या दुकानावर धाड घातली असता पोलिसांना प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचा साठा आढळला. या प्रकरणी फिर्यादी सपोनि केशव गोविंदराव पुंजरवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लाखनी पोलिस स्टेशन येथे 198/2024 कलम 188,272,273,328, भा.द.वी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे


या बाबत अधिक माहिती अशी की, (दि.27मे) रोजी मिळालेल्या मुखबिरच्या खबरे वरून सपोनि.केशव पुंजरवाड, पोहवा.कैलास पटोले,श्रीकांत मस्के,राजेश पंचबुध्दे, चालक पोहवा यांनी रामु गोविंदराव गुरूनानी (वय 49 वर्ष) रा.प्रभाग नं.1 लाखनी याच्या किराणा दुकानाची व गोडाउनची प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थबाबत झडती घेतली असता, आरोपीचे किराणा दुकानाचे गोडाउनमध्ये 1) एका पोपटी प्लास्टीक चुंगळीमध्ये SUPER PRIMIUM QUALITY HUKKA 200 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचे 54 नग प्लास्टीक पाउच प्रत्येकी किमती 90/- रू. प्रमाणे 4,860/- रू. 2) एका पिवळ्या रंगाचे प्लास्टीक चुंगळीमध्ये रत्ना छाप तंबाकु नं. 3000 चे 50 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाकु चे 70 नग लहान डब्बे, प्रत्येकी किमती 118/- रू. असे एकुण 8,260/- रू. तसेच 3) चुंगळीमध्ये HOLA HUKKA SHISHA TOBACCO 200 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचे 12 नग प्लास्टीक पाउच प्रत्येकी 164/- रू. प्रमाणे 1,968/-रू., 4) एका पांढ-या रंगाचे प्लास्टीक चुंगळीमध्ये EAGLE HUKKA SHISHA TOBACCO 40 ग्रॅम वजनाचे प्रतिबंधीत सुगंधीत तंबाखुचे 9 नग प्लास्टीक पाउच प्रत्येकी किमती 64/- रू. प्रमाणे किमती 576/-रू. असा एकुण 15,664/- रू. चा प्रतिबंधीत सुगंधित तंबाखू माल मिळुन आल्याने आरोपी विरूध्द पो.स्टे. लाखनी येथे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोउपनि. देविदास बागडे पो.स्टे. लाखनी हे करीत आहेत.

अशा प्रकारे सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक लोहीत मतानी, अपर पोलीस अधिक्षक ईश्वर कातकडे यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक,स्थागुशा नितीनकुमार चिंचोळकर , स.पो.नि. केशव पुंजरवाड, पोहवा. कैलास पटोले, श्रीकांत मस्के, राजेश पंचबुध्दे, चालक पोहवा.अमोल खराबे सर्व नेमणुक स्थागुशा भंडारा यांनी केली आहे.



